सहायक वनसंरक्षक वैभव भालेराव कालवश

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल* 


**


*पुणे :-* सहायक वनसंरक्षक म्हणून पुणे येथे कार्यरत असलेले श्री वैभव भालेराव यांचे दि.१४/१०/२०२० रोजी दुःखद निधन झाले. ते १९८९-९० बॅचचे वन अधिकारी होते. गेली ३० वर्षे वनविभागात कार्यरत असेलेले श्री. भालेराव हे अत्यंत कर्तव्यदक्ष, मनमिळावू स्वभावाचे व प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जात होते. आपल्या सेवेची सुरुवात धुळे, नंदुरबार सारख्या आदिवासी भागातून केल्यानंतर त्यांनी नांदेड जिल्ह्यातील किनवट, पुणे जिल्ह्यातील जुन्नर वन विभागातील ओतूर, घोडेगाव या वनपरिक्षेत्रांत वनसंवर्धनाचे, वने व वन्यजीव रक्षणाचे महत्वाचे काम केले. त्यांच्याच कार्यकाळात जुन्नर वनविभागात शिवनेरी विकास प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. तद्नंतर त्यांनी पुणे वन विभागातील भांबुडी वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणूनही काम पाहिले. कार्य आयोजना विभागात काम करताना त्यांनी अनेक जिल्ह्यांच्या कार्य आयोजना (Working Plan) तयार करणेकामी मोलाचे योगदान दिले.


पदोन्नतीनंतर कार्य आयोजना विभाग, औरंगाबाद येथील कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुणे वन विभागात सहायक वनसंरक्षक या पदावर काम केले. तेथून त्यांची नुकतीच कार्य आयोजना विभाग, पुणे येथे बदली झाली होती. आपल्या कर्तव्यात सदा तत्पर असणाऱ्या, दुसऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यास व त्यांच्या मदतीस सदैव तयार असणाऱ्या श्री. वैभव भालेराव यांच्या अचानक जाण्याने त्यांचे कुटुंबीय, निकटवर्तीय, मित्र परिवाराबरोबरच वनविभागाचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


💐🌹🌻🌺💐🌸🌷🌷  


  सहायक वनसंरक्षक वैभव भालेराव कालवश


*सा. पुणे प्रवाह परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली*


💐🌹🌷🌸 🙏🙏🙏


Popular posts
*एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, भारततर्फे एमआयटी स्कूल ऑफ कॉन्शियसनेस -अल्टिमेट रिअ‍ॅलिटी संशोधन संस्थेचा शुभारंभ सामाजिक बांधिलकीतून होईल संशोधन*
Image
🚩 *शिवराज्याभिषेक* 🚩 *मनामनात* 🚩 *शिवराज्याभिषेक*🚩 *घराघरात*
Image
कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणाकरिता क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आढावा,
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image