पुणे प्रवाह न्युज पोर्टल
दुबई :- क्विंटन डी. कॉक, सूर्यकुमार यादव यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर मुंबईने दुसऱ्या सामन्यात दिल्लीवर ५ गडी आणि २ चेंडू राखून मात केली.
दिल्लीकडून शिखर धवनने नाबाद ६९ धावांची खेळी केली, पण त्याची खेळी व्यर्थ ठरली.
या विजयासह मुंबईने गुणतालिकेत अव्वलस्थान परत मिळवले.
मुंबईने दिल्लीचा पराभव केल्यामुळे त्यांच्या नावावर एका नकोशा विक्रमाची नोंद झाली.
आय.पी.एल.(I.P.L.) स्पर्धेत १०० पराभवांना सामोरं जावं लागणारा दिल्ली हा दुसरा संघ ठरला.
पंजाबच्या संघाने सर्वप्रथम हा नकोसा विक्रम आपल्या नावे केला.
कोलकाताविरूद्धच्या अटीतटीच्या लढतीत जेव्हा पंजाब दोन धावांनी पराभूत झाला तेव्हा तो त्यांचा १०० वा पराभव होता.
त्यानंतर रविवारी मुंबईविरूद्धच्या सामन्यात दिल्लीच्याही नावावर या नकोशा विक्रमाची नोंद झाली.
पंजाब आणि दिल्ली, दोन्ही संघांनी अद्याप एकदाही आय.पी.एल.(I.P.L..) चे विजेतेपद मिळवलेले नाही.
नाणेफेक जिंकून दिल्लीने प्रथम फलंदाजी केली. पहिली संधी मिळालेला अजिंक्य रहाणे १५ धावांवर बाद झाला. कर्णधार अय्यर ३३ चेंडूत ४२ धावा काढून बाद झाला.
पण सलामीवीर शिखर धवन शेवटपर्यंत नाबाद राहिला.
त्याने ५२ चेंडूत नाबाद ६९ धावा केल्या. त्याच्या खेळीत ६ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता.
त्यामुळे दिल्लीने १६२ धावांपर्यंत मजल मारली.
या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने संयमी सुरूवात केली.
सलामीवीर क्विंटन डी. कॉकने मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करत ३६ चेंडूत ५३ धावांची खेळी केली.
सूर्यकुमार यादवनेही फटकेबाजी करत ३२ चेंडूत ५३ धावा केल्या.