विजयादशमीनिमित हिंदवी स्वराज्य संघ पुणे शहरच्या वतीने कोरोना काळात काम करनारे व्यक्तिंना कोरोना योध्हा पुरस्कार व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल पुणे :- रामटेकडी जवळील स्वामी विवेकानंद नगरमधील सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राजक्ता सोसायटीचे अध्यक्ष स्टीव्हन येशुदास, हिंदवी स्वराज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष मोहन नारायणे, सगाई नायर, शीला शिंदे, राजेश नायर, राजेंद्र शेकटकर आदी मान्यवर उपस्थित होते. 


यामध्ये हसन रंगरेज, विजय भोसले, विनायक भगत, राजाभाऊ चव्हाण आदींचा कोरोना योध्हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच सृष्टी जोगदनकर व सेजल माहेश्वरी या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. 


यावेळी हेमंत माहेश्वरी, सुनिल अंकुर, अजिस ढोलक्यावाला, प्रफुल्ल सोनावणे, शिवपुत्र जोगदनकर , नीता जोगदनकर , रवी जावळे, तौफिक कुरेशी, महिला कार्यकर्त्या अंजना नारायणे, ज्योती माहेश्वरी, अनुजा हकारे, सलमा मोमीन, मंगल भुतडा आदीनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.