गरजु विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


* *प्रतिनिधी. सुनिल ज्ञानदेव भोसले*


पुणे :- आत्ताच्या कोरोनाच्या आव्हनात्मक काळात गरजवंत विद्यार्थ्याचा शोध घेऊन त्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचा उपक्रम ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक या संस्थेचा उपक्रम कौतुकास्पद बाब आहे. असे प्रतिपादन लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी केले.ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ व सेवाभावी संस्थेच्या वतीने गरजु व गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सई भोरे पाटील यांच्या हस्ते आदिवासी पारधी समाजाचा विद्यार्थी ग्रीष्म तुकाराम भोसले व अनेक गरुजु विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.पंचायत समिती हवेलीचे उपसभापती युगंधर काळभोर, हवेली तालुका शिवसेना प्रमुख प्रशांत काळभोर , योग हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अभिजित दरक, शिवसेना जिल्हा संपर्के प्रमुख रमेश भोसले, कदमवाकवस्तीचे माजी सरपंच नंदु पाटील काळभोर शिवसेना महिला आघाडी प्रमुख श्रध्दा कदम, सराफ असोशिएशन लोणी अध्यक्ष सचिन काळभोर, उद्योजक बावू चावट, पोलिस पाटील प्रियंका भिसे, सोसायटीचे चेअरमन राहुल काळभोर, माजी चेअरमन विठ्ठल काळभोर , संदिप शिवरकर, सामाजीक कार्यकर्त गणेश गायकवाड, माऊली काळभोर,अविनाश वाघमारे, व परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. हवेली तालुका पत्रकार संघाचे सदस्य, पुर्व हवेली डॉ असोसिएशनच्या वतीने डॉ. अभिजीत नलावडे उपस्थित होते. कोरोनाच्या कठीण काळात दोन गोष्टीचा पुन्हा प्रत्यय आला. गरज हि शोधाची जननी असते. अचानक झालेल्या लॉक डाऊनमुळे सर्व जण स्तब्ध झाले होते. कोणालाच काहीच सुचवता येत नव्हते. ही परिस्थिती अजुन किती काळ राहणार आहे याचाही अंदाज नव्हता. आणि या अभूतपुर्व परिस्थितीत मुळांचा अभ्यास कसा सुरु ठेवावा या विषयी कोणताही पुर्वाभव नव्हता. सुरुवातीला हे अंधारात चाचपडण्यासारखे होते पण ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ या मदतीला धावत येत असुन आपण समाजाचे काही देणे आहोत या भावनेपोटी मी सुध्दा दहा मुलांचा शिक्षणाचा खर्च करत.असल्याचे सुरज बंडगर यांनी सांगितले. यावेळी डॉ.अभिजीत दरक यांनी सांगितले माणसाची परिस्थिती महत्वाची नसुन परिस्थितीवर मात करून एक आदर्श नागरीक बनायचे म्हणायचे आहे. लोणी काळभोर येथील संत निरंकारी संत्संग भवन येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात डॉ रतन काळभोर, व डॉ.नलावडे यांनी या सर्व विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी करून आवश्यक ती सर्व औषधे मोफत उपलब्ध करुन देण्यार असे जाहिर केले. कार्यक्रमांचे आयोजन ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकर्त यांनी केले. संत निरंकारी सत्संग मंडळ यांनी मोलाचे सहकार्य केले.