Facebook,Twitter वरील फेकअकाउंट म्हणजे मानवी मेंदू हॅक करून समाजाची वैचारिक दिशा बदलण्याचे षडयंत्र ------- उमेशपाटील

पुणे प्रवाह न्युज पोर्टल #Facebook,#Twitter वरील #फेकअकाउंट म्हणजे माणवी मेंदू हॅक करून समाजाची वैचारिक दिशा बदलण्याचे षडयंत्र -#उमेशपाटील


#सुशांतसिंग प्रकरणाचा राजकिय फायदा उठवण्यासाठी,#भाजपने #महाराष्ट्राची अस्मिता वेशीवर टांगली.संपुर्ण देशात #मुंबईपोलीसांना पर्यायाने महाराष्ट्राला बदनाम केले.भाजपच्या आय टी विभागाने 80,000 फेक #फेसबुक / #ट्विटर अकाउंटचा उपयोग करून देशभरात #मुंबई #पोलीसांची,#महाराष्ट्रशासन,#मुख्यमंत्री,#गृहमंत्री व #आदित्यठाकरे यांच्या बदनामीचे सुनियोजित षडयंत्र रचले.एकाचवेळी हजारो अकाऊंट वरून #सोशलमिडिया दणाणून सोडला.मुंबई पोलीसांना सुशांतसिंग प्रकरणात बदणाम केले गेले.


काय आहे ही कार्यपद्धती ?


सोशल मीडियावरील फेक अकांउटला आपण ओळखू शकत नाही.देशभरामध्ये भाजपच्या #आयटी विभागाने हजारो आयटी तज्ञ व त्यांच्या हाताखाली लाखो मुले/मुली या कामासाठी पगारी ठेवले आहेत.मानवी मेंदूवर एखाद्या विषयाचा सातत्याने भडीमार होत राहीला तर,त्याचा #मानसशास्त्रीय परिणाम होऊन मानवी मन त्या दिशेने नैसर्गिकरीत्या विचार करायला लागते.एखाद्या विषयाची मांडणी अशा पद्धतीने केली जाते की सामान्य माणूस,त्या विषयाची सत्यता तपासून पाहण्याच्या भाणगडीतच पडत नाही.अशा कृत्रिमरित्या निर्माण केलेल्या विचार जंजाळात सामान्य माणसाचे मन कधी अडकले हे त्यालाही कळत नाही.#तंत्रज्ञानाचा वापर करून काही विशिष्ठ संगनकीय कौशल्याच्या आधारे,सोशल मीडियाचा वापर करणा-या सामान्य व्यक्तींच्या टाईम वाॅलवर विशिष्ठ पोस्ट सातत्याने आपोआप येत राहतात.फेक #यूट्यूब #न्यूज #चॅनल वर संगनकीय करामती करून,खोटे व्हिडीओ पोस्ट केले जातात.माणवी मनावर चलचित्रांच्या मानसशास्त्रीय परिणामाची एक मालिका सुनियोजित रित्या पेरली जाते.कालांतराने या सर्व खोट्या विषयाचे #पब्लिकपर्सेप्शन मध्ये रूपांतर होते.


सुशांत सिंगची #आत्महत्या नाही तर ती #हत्या होती असा #नॅरेटीव्ह सेट करण्यात या खोट्या सोशल मिडिया अकाउंटचा वापर करणा-या यंत्रणेला यश आले.९०% लोकांना सुशांतसिंगची हत्या झाली असावी असेच वाटत होते.९०% लोकांना मुंबई पोलिसांबद्दल संशय वाटत होता.९०% लोकांना आदित्य ठाकरेंचा या प्रकरणात कुठेतरी संबंध असावा असे वाटत होते.हे जे वाटत होते,ते म्हणजेजच "पब्लिक पर्सेप्शन" तसे तयार केले गेले होते.तेही #बीजेपीच्या सोशल मीडिया विभागाच्या फेक अकांऊंटस् च्या माध्यमातून.


सामुहिक विचारांचे केंद्रीकरण झाल्यानंतर,व्यक्ती समुहाची मती गुंग होऊन जाते व जे विचार नैसर्गिक रित्या मनात नकळतपणे चालू राहतात,त्या विचारांचे नियंत्रण करणारी कृत्रिम व्यवस्था म्हणजे भाजपची फेक सोशल मिडिया अकाऊंट चालवली जाणारी यंत्रणा आहे.या यंत्रणेवर हजारो कोटी रूपये खर्च केले जातात.या कामासाठी परदेशी तंत्रज्ञान,#एनआरआय भारतीयांचा #पैसा वापरला जातो.


#मोदीभक्त म्हणून ज्यांचा आपण उल्लेख करतो,ती जिवंत माणसे एकाच वेळी 100 /100 फेक अकाऊंट चालवणारी काही पगारी माणसे आहेत.या सर्वांना समाजात विष पेरण्यासाठी लागणारे खाद्य,भाजपच्या #दिल्लीतील मुख्य कार्यालयात बसलेल्या आय टी विभागातील #RSS च्या थिंक टॅंक कडून पुरवले जाते.त्या साठी विशेष #संशोधन केले जाते.समाजात नैसर्गिक पणे घडणा-या घटणाचे वर्गीकरण केले जाते.त्या घटनांचे,#बातम्यांचे उपयोजनमुल्य तपासून,कुठल्या विषयाला हवा दिली म्हणजे,त्याचा राजकीय लाभ मिळेल याचा विचार केला जातो.एकदा विषय ठरला की,त्या विषयाला पुरक, डिझाईन बनवल्या जातात,जोक्स तयार केले जातात, कार्टून बनवले जातात, व्हीडिओ बनवले जातात,रेडीमेड फेसबुक/ट्विटर पोस्ट बनवून बल्क स्वरूपात तयार ठेवल्या जातात,रेडीमेड व्हिडिओ क्लिप्स तयार करून ठेवल्या जातात.खोट्या आकडेवारीची खोटी परंतु शासकीय वाटावी अशी कागदपत्रे तयार केली जातात, समाजातील निस्पृह परंतु भाजप सुसंगत विचारांच्या मान्यवर सेलिब्रिटी व्यक्तिमत्वांना त्या विषयावर बोलते केले जाते,मिडिया हाऊसेस मध्ये पेरलेल्या एजंट कडून #प्राईमटाईम अजेंडा सेट केला जातो.हे सर्व एकाच वेळी केले जाते.यातही A Plan,B Plan असतो.#ट्रोलिंग स्ट्रॅटेजी व ट्रोल टार्गेट ठरवले जातात.काही विषय अंगावर आले तर बॅकअप प्लॅन सुद्धा तयार असतो.


#काॅंग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने,देशाच्या प्रगतीसाठी #तंत्रज्ञान आपल्या देशात आणले.त्यातुनच #संगणक व #मोबाईल युग अवतरले.१४० कोटी लोकांच्या खिशात २०० कोटी #मोबाईल आले.एकाच वेळी २/२ मोबाईल फोन बाळगणारा भारतीय व्यक्ती,संपुर्ण जग खिशात घेऊन फिरायला लागला.याच करोडो #नेटिझन्सच्या विचार विश्वावर कृत्रिम ताबा मिळवण्याचा अघोरी प्लॅन RSS च्या सुपिक थिंक टॅंकने केला व या प्लॅनचा पहिला अविष्कार म्हणजे "#अण्णा आंदोलन" कांग्रेस सरकार विरूद्ध #भ्रष्टाचाराचा महाप्रचंड नॅरेटीव्ह सेट करण्यात अण्णा आंदोलनाचा सर्वात मोठा वाटा होता.या मागे RSS ची IT तज्ञांची सुसज्ज यंत्रणा कार्यरत होती.या काळात #2Gस्पेक्ट्रम घोटाळा,#कोलघोटाळा व लाखो कोटी रूपयांचे घोटाळ्याचे आकडे ऐकून देशातील सामान्य नागरिकांमध्ये तात्कालिक काॅंग्रेस सरकार विरूद्ध प्रचंड चिड निर्माण झाली.ही चिड निर्माण होण्यामागे सोशल मीडियाच्या फेक अकाउंटचा सर्वात मोठा वाटा होता.यातून निर्माण झालेल्या सरकार विरोधी लाटेवरच #नरेंद्रमोदी स्वार झाले व #देशात राजकीय सत्तांतर घडून आले.


महाराष्ट्रामध्ये त्याच काळात #सिंचनघोटाळ्याचे सुद्धा असेच काल्पनिक भूत निर्माण केले गेले.हे भूत #अजितदादांच्या मानगुटीवर असे घट्ट बसले की,त्याचा परिणाम अजित दादांना राजीनामा द्यावा लागला. 2G स्पेक्ट्रम घोटाळा,कोल घोटाळा,सिंचन घोटाळा या प्रकरणांना अशाच खोट्या सोशलमीडिया अकाऊंटचा वापर करून हवा दिली गेली.या विषयाचा अशा पद्धतीने भडीमार केला की,एखाद्याचे सार्वजनिक आयुष्य उद्ध्वस्त व्हावे.या प्रकरणांसाठी वापरण्यात आलेली #मोडसॲापरंटी तीच होती,जी आज सुशांत सिंगच्या प्रकरणात वापरली गेली.फरक एवढाच की,त्यावेळी असा काही प्रकार असू शकतो,याचा विचारही कुणी केला नव्हता.फक्त RSS ने तसा केला होता.या लोकांनी फक्त विचारच केला नाही तर या कार्यपद्धतीचा कुशाग्र बुद्धीने परंतु कुटील हेतूने सुनियोजित वापर देखिल केला.आजही तोच प्रकार चालु आहे.उलट तो अधिक #प्रोफेशनल पद्धतीने चालू आहे.


सुशांतसिंगच्या मृत्यूचा मोठा राजकीय लाभ होऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर सुनियोजित षडयंत्र रचून,या विषयाला हजारो फेक अकाउंटच्या माध्यमातून समाजात पेरले गेले.भाजप विचारांच्या #चित्रपटसृष्टीतील #कलाकारांना या विषयावर बोलण्यासाठी उद्युक्त केले गेले.या सर्वाचा एकत्रित परिणाम होऊन संपुर्ण देशाला सलग ३/४ महिने सुशांतसिंग या एकाच विषयावर अनावश्यक मंथन करणे भाग पाडले गेले.या मागचा कुटील राजकीय डाव #AIMS च्या अहवालामुळे उघडकीस आला.पण मेलेल्या मड्यावरचे लोणी सुद्धा चाटून खायला या भाजपच्या औलांदींना लाज कशी वाटली नाही? हा खरा प्रश्न आहे.जगात ज्या मुंबई पोलीसांना स्टाॅटलंड यार्ड पोलीसांच्या नंतरचा संन्मान मिळतो, महाराष्ट्रातील त्या पोलीसांना स्वार्थी राजकीय हेतूने बदनाम केले गेले.हा एकप्रकारे राजकीय व्याभिचार आहे.ज्या महाराष्ट्रात जन्म झाला त्या महाराष्ट्राची आब्रू वेशीवर टांगताना या लोकांना लाज कशी वाटली नाही ? .महाराष्ट्राचा अभिमान स्वाभिमान #कंगणाराणावतने #पाकिस्तानमध्ये नेऊन विकला,#बिहारच्या #पोलीसमहासंचालकाने #सुप्रीमकोर्टाच्या निकालानंतर महाराष्ट्रातील पोलीसांची खिल्ली उडविली,त्यावेळी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची मराठी अस्मिता कुठल्या वेशीवर टांगली होती ? याचा शोध महाराष्ट्र घेतल्याशिवाय राहणार नाही.


सुशांतसिंगला #आत्महत्या करताना जेवढ्या वेदना झाल्या नसतील,त्या पेक्षा जास्त वेदना भाजपवाल्यांनी त्याच्या मृतदेहाचे जे राजकीय विच्छेदन केले,त्यामुळे त्याच्या आत्म्याला झाल्या असतील.तंत्रज्ञानाचा व फेक सोशल मिडिया अकाऊंटचा राजकारणासाठी परिणामकारक उपयोग होत असल्याने, समाजात जाऊन लोकांची सेवा करण्याची गरजच वाटू नये,एवढी सोपी कला मोदींच्या कृपेने भाजपच्या लोकांनी २०१४ पुर्वीच साध्य केली आहे.दुर्दैवाने त्यांना त्यात यशही येत आहे.पण हे अभासी जग आहे.#ajitpawarfc #sharadpawarspeaks #ParthPawar #namratawagle #sanjayawate #rajuparulekar #RajdeepSardesai #rohitPawar #sharadPawar #ajitPawar #jayantPatil #rajeshTope #dhananjayMunde


https://youtu.be/z-cIIejiC_k