उपप्रादेशिक परीवाहम आधिकारी (आर.टी.ओ.) कार्यालयाचे काम मंद गतीने सर्व्हर डाऊन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*उपप्रादेशिक परीवाहम आधिकारी (आर.टी.ओ.) कार्यालयाचे काम मंद गतीने सर्व्हर डाऊन*


*सोलापूर :* गेल्या काही दिवसांपासून अनेक नागरिक हे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ( आर.टी.ओ.)काम संथगतीने चालले आहे अशी तक्रार करत आहेत. सर्व्हर डाऊन असल्याकारणाने काम वेळेवर होत नाहीत असं कारण पुढे करून अनेकांना परत पाठवले जात आहे. अशाही तक्रारी अनेक नागरिकांनी केल्या आहेत. यावर संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला असून काम लवकरात लवकर करून नागरिकांना त्रास मुक्त करा अशा मागण्या केल्या असून याबाबत मा.जिल्हाधिकारी सो.आणि आर.टी.ओ.चे अधिकारी यांना निवेदन दिले आहे.


वाहन नोंदणी, लायसन्स गाडी बदलाची नोंद घेणे, शिकाऊ ( लर्निक )लायसन ,कायम स्वरूपी लायसन्स आणि इतर अनेक गोष्टीसाठी ऑनलाईन पद्धत उभी करण्यात आली आहे.


 मात्र नागरिकांनी आपल्याला ज्या कागद पात्रांची पूर्तता करायची आहे त्या सगळ्या कागद पात्रांची पूर्तता केली.


मात्र, ती छाननी करण्याकरता अधिकारी वर्ग आणि कर्मचारी हे कार्यालयात असलेल्या सर्व्हरच्या कनेक्शनचे कारण देऊन या कामाना वेळ लावतात. बरेच दिवस अनेक लोक येऊन परत जातात तर काही लोक न चुकता रोज येरझाऱ्या माराव्या लागतात..