हाथरसमधील पीडित कुटुंबाच्या न्यायासाठी काँग्रेस उद्या राज्यभर सत्याग्रह करणार ; बाळासाहेब थोरात

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


......


उत्तर प्रदेश :- उत्तर प्रदेशातील तीहाथरसच्या पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष संघर्ष करत असून, उद्या (सोमवार) राज्यभरात सत्याग्रह करण्यात येणार आहे. 


पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरुच राहील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. 


उत्तर प्रदेशातील हाथरसच्या घटनेने देशाला शरमेनं मान खाली घालायला लावली. 


पण भा.ज.पा.च्या योगी आदित्यनाथ सरकारची थोडीही संवेदना जागी झाली नाही. 


हे प्रकरण अत्यंत बेजबाबदारपणे व हुकुमशाही पद्धतीने हाताळण्यात आले. 


पीडित कुटुंबाला न्याय देण्याऐवजी त्यांना धमक्या देण्यापर्यंत उत्तर प्रदेश सरकारची मजल गेली, असल्याचा आरोपही थोरात यांनी केला आहे. 


या संदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, भा.ज.पा.शासीत राज्यात महिला व मुली सुरक्षित नाहीत.


 ‘बेटी बचाओ’चा नारा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र मूग गिळून गप्प आहेत. 


काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशातील भा.ज.पा.च्या अहंकारी सरकारला जाब विचारण्यासाठी व पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सोमवारी राज्यव्यापी सत्याग्रह करणार आहे. 


राज्यातल्या सर्व जिल्हा मुख्यालयी हा सत्याग्रह केला जाणार आहे. 


आपण स्वतः मुंबई येथे सत्याग्रहात सहभागी होणार आहोत, असे थोरात म्हणाले. हाथरस प्रकरणाची प्रकरणाची मे.न्यायालयीन चौकशी मे.सुप्रीम कोर्टामार्फत करावी. 


हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्याला निलंबित करावे. 


पीडितेचा मृतदेह पोलिसांनी परस्पर पेट्रोल टाकून का जाळला ? 


उत्तर प्रदेश प्रशासनाने वारंवार दिशाभूल का केली ? 


पीडित कुटुंबाला धमक्या का दिल्या ? 


आणि जाळण्यात आलेला मृतदेह पीडितेचाच होता यावर विश्वास कसा ठेवायचा?