पुणे विभागातील 4 लाख 3 हजार 482 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी         विभागात कोरोना बाधित 4 लाख 70 हजार 638 रुग्ण                               -विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



  पुणे,दि.11 :- पुणे विभागातील 4 लाख 3 हजार 482 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 70 हजार 638 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 54 हजार 503 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 12 हजार 653 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.69 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 85.73 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. 


पुणे जिल्हा


  पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 5 हजार 144 रुग्णांपैकी 2 लाख 65 हजार 736 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 32 हजार 405 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.29 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 87.09 टक्के आहे. 


सातारा जिल्हा


   सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 41 हजार 295 रुग्णांपैकी 33 हजार 111 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 838 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 346 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 


सोलापूर जिल्हा


    सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 36 हजार 591 रुग्णांपैकी 30 हजार 22 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 318 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 251 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  


  सांगली जिल्हा


               सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 40 हजार 894 रुग्णांपैकी 34 हजार 837 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 545 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 512 रुग्णांचा मृत्यू झाला आहे


कोल्हापूर जिल्हा


  कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 714 रुग्णांपैकी 39 हजार 776 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 397 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 541 रुग्णांचा मृत्यू झाला आहे 


कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ 


कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 2 हजार 781 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 795, सातारा जिल्ह्यात 314, सोलापूर जिल्ह्यात 257, सांगली जिल्ह्यात 250 तर कोल्हापूर जिल्ह्यात 165 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.


कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण -  


पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 4 हजार 401 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 2 हजार 84 , सातारा जिल्हयामध्ये 359, सोलापूर जिल्हयामध्ये 470, सांगली जिल्हयामध्ये 524 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 964 अशा रुग्णांचा समावेश आहे.


पुणे विभागातील सर्व्हेक्षण


आजपर्यत विभागामध्ये एकुण 21 लाख 4 हजार 136 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 70 हजार 638 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. 


( टिप :- दि. 10 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )


                         *****