सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पुणे नॉलेज क्लस्टर व आयुका यांच्यासोबत सामंजस्य करार

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



पुणे, दिनांक २० ऑक्टोबर २०२० : 


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आज मंगळवार दिनांक २० ऑक्टोबर २०२० रोजी पुणे नॉलेज क्लस्टर व इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रॉनॉमि अँड ऍस्ट्रॉफिजिक्स (आयुका) यांसोबत सामजंस्य करार केला. 


या करारानुसार येत्या काळात पुणे नॉलेज क्लस्टर, आयुका व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा या तीन संस्थांतर्फे महत्वाच्या विषयावरील संशोधना बरोबरच शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.  


या सामंजस्य करारावेळी कुलगुरू प्रो. (डॉ.) नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, संचालक आयुका डॉ. सोमक रॉयचौधरी, प्रिंसिपल इन्व्हेस्टीगेटर पुणे नॉलेज क्लस्टर (माजी संचालक आयुका) प्रा. अजित केम्भावी, पुणे नॉलेज क्लस्टरचे डॉ. सुरेंद्र घासकड बी, वरिष्ठ प्रशासकीय संचालक, आयुका डॉ. निरंजन अभ्यंकर, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, आंतर-विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुरेश गोसावी, तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर, इंटरडिसिप्लिनरी स्कूल ऑफ सायन्सचे प्रमुख डॉ. अविनाश कुंभार, संचालक क्रीडा विभाग डॉ. दीपक माने, संचालक , परीक्षा व मूल्यमापन मंडळ महेश काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.