स्पर्धकांना मिळालेल्या गाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल - 'सिंगिंग स्टार', ४-५ सप्टेंबर, फर्माईश विशेष

 पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


स्पर्धकांना मिळालेल्या गाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल - 'सिंगिंग स्टार', ४-५ सप्टेंबर, फर्माईश विशेष


सोनी मराठी वाहिनीवर सुरू झालेल्या


'सिंगिंग स्टार' 


या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. येत्या आठवड्यात फर्माईश विशेष भाग असून स्पर्धकांना त्यांच्या आवडत्या कलाकारांकडून गाण्यांच्या फर्माइशी आल्या आहेत. स्पर्धक ती गाणी या विशेष भागात सादर करणार आहेत.


सुबोध भावे, शुभांगी गोखले, मकरंद अनासपुरे, मुक्ता बर्वे, अभिज्ञा भावे, सई ताम्हणकर, सुमित राघवन, कविता लाड-मेढेकर, स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे आणि सिद्धार्थ जाधव या कलाकारांनी आपल्या स्पर्धक-मित्रांसाठी गाण्याच्या खास फर्माइशी पाठवल्या आहेत.


'सिंगिंग स्टार'मध्ये आरती वडगबाळकर, आस्ताद काळे, अभिजीत केळकर, अजय पुरकर, अंशुमन विचारे, अर्चना निपाणकर, गिरिजा ओक, पूर्णिमा डे, संकर्षण कऱ्हाडे, स्वानंदी टिकेकर, यशोमन आपटे हे स्पर्धक कलाकार आहेत.


४ आणि ५ सप्टेंबरला प्रसारित होणाऱ्या भागांत स्पर्धक गाणार आहेत त्यांच्या कलाकार मित्रांनी फर्माईश केलेली गाणी!


पाहा, 'सिंगिंग स्टार' शुक्र.-शनि., रात्री ९ वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.


गाणे ताऱ्यांचे, गाणे साऱ्यांचे...