उष्टी हळद संसार रंगवणार की मोडणार? स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेत येणार नवं वळण

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


मुंबई :- स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेचं कथानक उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अनिरुद्ध आणि अरुंधतीच्या २५व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने पुन्हा एकदा या दोघांचं लग्न करण्याचं घरच्यांनी ठरवलं आहे. यासाठी जय्यत तयारीही सुरु झालीय. घरात आनंदाचं वातावरण आहे. एकीकडे या दोघांच्या लग्नाची धामधूम सुरु असताना संजना आणि अनिरुद्धच्या नात्याचाही उलगडा होणार की काय अशी परिस्थीती निर्माण झालीय. या दोघांच्या नात्याबद्दल हळूहळू सर्वांनाच कल्पना येऊ लागली आहे. हळदी समारंभाच्या कार्यक्रमात तर संजनाच्या बेफाम वागण्यामुळे अरुंधतीच्या मनातही शंका निर्माण होणार आहे. त्यामुळे उष्टी हळद अनिरुद्ध आणि अरुंधतीचा संसार रंगवणार की मोडणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल.


PROMO: https://www.facebook.com/watch/?v=792582311283097&extid=iZ1O0YNH0mQYVyBf


‘आई कुठे काय करते’ मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतल्या प्रत्येक पात्रावर प्रेक्षक मनापासून प्रेम करत आहेत. मालिकेचा वाढत जाणारा टीआरपी याच प्रेमाचं प्रतिक आहे. या यशात मालिकेच्या कलाकारांसोबतच, मालिकेचे लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ मंडळी यांचादेखिल महत्त्वाचा वाटा आहे. दिवसरात्र राबून ही सर्व मंडळी ‘आई कुठे काय करते’ ही कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात. यापुढेही नवनवी आव्हानं स्वीकारुन प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी आई कुठे काय करतेची संपूर्ण टीम सज्ज आहे. त्यासाठी पाहायला विसरु नका ‘आई कुठे काय करते’ दररोज सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.