एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व माईर्स एमआयटीतर्फे सुप्रसिद्ध रेडिओ खगोल शास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरूप यांना श्रध्दांजली

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



पुणे, दिः 8 सप्टेंबरः भारतीय रेडिओ शास्त्रांचे जनक मानले जाणारे सुप्रसिद्ध रेडिओ खगोलशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. गोविंद स्वरूप यांना माईर्स एमआयटी, पुणे आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे शिक्षण संस्थेचे संस्थापक विश्वस्त प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड व एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांनी भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली.


प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ माईर्स एमआयटीच्या स्थापनेपासून डॉ. गोविंद स्वरूप संस्थेशी जुळलेले होते. संस्थेचे सल्लागार असल्याने त्यांनी संस्थावृद्धीसाठी अनेक नव नवीन योजना आखून मार्गदर्शन केले होते. ते सायंटीफिक अ‍ॅडव्हायझरी कमिटीचे सदस्य होते. त्यांनी जगातील सर्वात मोठ्या घुमटालाही भेट देऊन ही वास्तू अद्भूत असल्याचे विचार मांडले होते. तसेच, संस्थेच्या अनेक कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून मार्गदर्शन केले होते. एमआयटीमध्ये त्यांच्या माध्यमातून कॅड कॅम सेंटर सुरू करण्यात आले होते. त्यातून अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी डिझाईन संबंधीचे प्रशिक्षण दिले होते. आमचे आणि त्यांचे ऋणानुबंधाचे नाते होते. त्यांच्या जाण्यामुळे संस्थेची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हिच परमेश्वराकडे प्रार्थना.”


राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“ संस्था वृद्धीगत त्यांनी मला वेळो वेळी मार्गदर्शन व सल्ला देते होते. भविष्यात वैज्ञानिक शिक्षणाच्या जोरावर आम्ही जगात कसे वर्चस्व प्रस्थापित करू हे सांगतांना शिक्षण क्षेत्रातील बदल या वर ते सदैव भाष्य करीत असत. त्यांच्या निधनामुळे आमची कधीही न भरून निघणारी मोठे नुकसान झाले आहे. एक उत्तम मार्गदर्शक गेल्याचे दुःख होत आहे.”


माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे विश्वस्त, संचालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू, प्र कुलगुरू व कर्मचार्‍यांनी ही त्यांना श्रध्दांजली वाहिली