टाळेबंदीने घात केला!’ नोटीस मिळूनही जिलानी इमारतीतील रहिवाशांना स्थलांतर करण्यात अडचणी......

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


‘टाळेबंदीने घात केला!’


नोटीस मिळूनही जिलानी इमारतीतील रहिवाशांना स्थलांतर करण्यात अडचणी......


 ठाणे : पावसाळा सुरू होण्यापूर्वीच महापालिकेची नोटीस आली..‘घरे रिकामी करा, इमारत धोकादायक आहे.’ यापूर्वीही अशा नोटिसा यायच्या. यंदा मात्र विभाग कार्यालयातील काही अधिकारी येऊन सांगून गेले. इमारतीचा पाया खचत चालला आहे. फार वेळ काढू नका इथे. हा इशारा तसा पुरेसा होता. आमच्यापैकी काहींनी दुसरा निवारा शोधण्यास सुरुवातही केली. परंतु करोना आडवा आला. सततची टाळेबंदी. संपूर्ण यंत्रणा करोना निवारण्यात व्यग्र. आमच्यापैकी काहींना शोधूनही इतर ठिकाणी घर सापडत नव्हते. मग विचार केला इतकी वर्षे निघाली. हा पावसाळाही तरून निघू. घडले मात्र भलतेच.. जिलानी इमारत दुर्घटनेतून बचावलेल्या बहुतेकांच्या तोंडी हीच कहाणी होती. जिलानी इमारत कधी तरी कोसळणार हे या भागातील जवळपास सर्वानाच माहीत असल्यासारख्या प्रतिक्रिया या दुर्घटनेनंतर येथे उमटताना दिसत होत्या. इमारत जुनी होती हा मुद्दा नव्हताच. या इमारतीच्या तळघरात असलेल्या बेकायदा यंत्रमागाच्या धक्क्याने ती केव्हाच खंगली होती. यंत्रमाग बंद झाल्यानंतर या ठिकाणी पावसाचे पाणी साचू लागले होते. त्यामुळे पाया खंगतोय हे स्पष्ट दिसत होते. फेब्रुवारी महिन्यात या इमारतीतील रहिवाशांना घरे रिकामी करण्याची सूचना पालिका प्रशासनाने दिली होती. त्यानंतर सगळीकडे करोनाचा हाहाकार सुरू झाला. पुढे मे महिन्याच्या अखेरीस पुन्हा महापालिकेची नोटीस मिळाली. यंदा मात्र नोटीस बजाविताना काही कर्मचारी अगदी काळजीने बोलत होते. परंतु करोनाने घात केला, अशी प्रतिक्रिया येथे राहणाऱ्या अहमत अन्सारी या २८ वर्षीय तरुणाने दिली. घरे शोधत होतो.पण मिळाली नाहीत. करोनाचा काळ असल्याने अनेकांना घरे मिळणे कठी.झाले.