महाराष्ट्रातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थी यांच्या परिक्षावर परिणाम होऊन देऊ नका..-संग्राम शेवाळे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



पुणे:- महाराष्ट्रात कोरोनाच्या काळात अंतिम वर्षाच्या विद्यार्थी यांच्या परीक्षा होणार का यावर खूप मोठे प्रश्नचिन्ह उभे झाले होते. अखेर सुप्रीम कोर्टाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे सक्तीचे केल्यानंतर महाराष्ट्रतील विद्यापीठ प्रशासन कामाला लागले.


परंतु या परीक्षेच्या काळात अशासकीय विद्यापीठ कर्मचारी आणि त्यांच्या संघटनेने यांनी काम बंद संप फुकरला आहे.आणि एकीकडे याच कर्मचारी अंतिम वर्षाच्या परीक्षेचे नियोजन या कर्मचारी वर्गावर अवलंबून असून विद्यापीठ प्रशासनाने अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत.आणि एकीकडे कर्मचारी यांचा संप यामुळे विद्यार्थी संभ्रम परस्थिती मध्ये आहेत.एक तर कोरोनाची महामारी चालू आहे सर्व विद्यार्थी ताण तणावात आहेत.तरी ते परीक्षेला सामोरे जाणार आहेत.त्यात या संपामुळे काही विद्यापीठ नागपूर,जळगाव,यांनी परीक्षा तारखा पुढे ढकल्या. तर काही विद्यापीठ परीक्षा तारखा पुढे ढकलण्याचा विचारात आहे.माझे असे मत आहे की कर्मचारी प्रशासनामुळे विद्यापीठ कामकाज चांगले चालते.कर्मचारी यांना त्यांच्या मागण्यांना न्याय मिळाला पाहिजे मी त्याला सहमत आहे.त्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी संबंधित प्रशासनाची लवकर भेट घेणार आहे.विद्यार्थी आणि कर्मचारी एका नाण्याच्या दोन बाजू असून परंतु या महामारीच्या काळात या संपाचा विद्यार्थी यांच्या परिक्षेवर काही परिणाम होऊन देऊ नका अशी मी नम्र विनंती करतो.असे जनता दल (से) विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संग्राम शेवाळे यांनी आमच्या माध्यमांशी बोलताना सांगितले.