माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहिम नागरिकांनी हातात घ्यावी : संजोग वाघेरे पाटील

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


*


पिंपरी १८ सप्टेंबर :- राज्यात व आपल्या पिंपरी चिंचवड शहरात कोविड १९ नियंत्रणात आणण्यासाठी व मृत्युदर कमी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोविड मुक्त महाराष्ट्र मोहिमे अंतर्गत “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही मोहिम राबविण्‍याची आवाहन केले आहे.  या मोहिमेत नागरिकांना आरोग्य शिक्षण व त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. कोरोना महामारीची साखळी तोडण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही मोहीम महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत आहे. या मोहिमेसाठी नागरिकांनी स्वतः हुन पुढाकार घेऊन आपल्या बरोबरच आपल्या कुटुंबांची तपासणी करून घ्यावी. तसेच घरी भेट देणाऱ्या महापालिकेच्या टीमला सहकार्य करावे व मोहीम यशस्वी होण्यासाठी जनतेने मोहीम हातात घ्यावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील नागरिकांना केले. 


        "माझे कुटुंब माझी जबाबदारी" या उपक्रमासाठी गृहभेट देवून तपासणी करणाऱ्या तीन सदस्यीय टीम महापालिकेकडून नेमण्यात आल्या असून या टीमद्वारे शहरातील प्रत्येक कुटुंबाची तपासणी करण्यात येणार आहे. पुनश्च हरीओम अर्थात मिशन बिगिन अगेनला राज्यात पुन्हा सुरुवात केली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेण्याचे आवाहन राज्य सरकारकडून 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी'  १५ सप्टेंबरपासून १० ऑक्टोबरपर्यंत ही मोहिम राबवली जाणार आहे.    


        रया मोहिमेअंतर्गत शहरातील प्रत्येक घरात महिन्यात दोन वेळा आरोग्याची चौकशी करण्यासाठी एक टीम जाईल. मास्कचा वापर आता स्वतःच्या सुरक्षेसाठी  'ब्लॅक बेल्ट' म्हणून करावा. तसेच बाहेरून आल्यानंतर कुटुंबाला विषाणूचा संसर्ग होणार नाही याची काळजी स्वतः घ्यावी. बोलताना फेस टू फेस बोलणं टाळवा. येत्या काळात पुन्हा लॉकडाऊन अथवा जनता कर्फ्यू करण्याची वेळ येवू नये म्हणून सोशल डिस्टंसिंगचं पालन करत माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहिम नागरिकांनी हातात घ्यावी असे आवाहन  वाघेरे पाटील यांनी केले आहे.


Popular posts
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image