लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई आयोजित "उत्सव शिक्षकाचां" सोहळ्याचे आयोजन!

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


**


              5 सप्टेंबर हा स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती पद भूषवलेले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.


दरवर्षी शाळांमधून मोठ्या उत्साहात विद्यार्थी वर्गाच्या उपस्थित साजरा होणारा शिक्षक दिन यंदा कोरोना महामारी च्या काळामुळे शाळाच बंद असल्या कारणाने साजरा करता येणे शक्य नव्हते.


शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र सुरूच आहे. शिक्षक या या काळात कोवीड योद्धा म्हणून कुठे कोवीड सेंटरला क्षेत्रीय अधिकारी, तर कुठे कंटेनमेंट एरियात सर्वेक्षण, तर कधी रस्त्यावरील वाहतूक निर्बंध तर काही ठिकाणी रेशनिंग दुकानांवर गर्दी नियंत्रण या स्वरूपात कार्य करत असतानाच विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचे धडे देखील देत आहेत. शिक्षकांच्या या कार्याचा सन्मान व्हावा या हेतूने लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे संस्थापक अध्यक्ष श्री विरेंद्र म्हात्रे यांच्या सहकार्याने लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई यांनी शिक्षकांचा "उत्सव शिक्षकाचां" सोहळ्याचे आयोजित केला.


आभिनेत्री नयन पवार यांनी याप्रसंगी शिक्षकांना शुभेच्छा तर दिल्याच त्याच बरोबर कोरोना काळातील शिक्षकांच्या या कार्याचा गौरव देखील केला. लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे संस्थापक अध्यक्ष श्री विरेंद्र म्हात्रे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात पत्रकार पेशा ने केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. तसेच स्वतःच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोठा वाटा असल्याचं देखील नमूद केले.


        जयश्री फाउंडेशनचे अध्यक्ष वैभव जाधव यांनी त्यांच्या संस्थेमार्फत शैक्षणिक क्षेत्रासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.


       याप्रसंगी नोंदणी केलेल्या १८ शिक्षकांनां शाळेमध्ये जाऊन सन्मानपत्र प्रदर्शित करून या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.


लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे संस्थापक अध्यक्ष श्री. विरेंद्र म्हात्रे यांनी भविष्यात देखील शिक्षकांच्या उपक्रमाला सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.


या "उत्सव शिक्षकांचा" या सोहळ्याचे आभार प्रदर्शन श्री. विरेंद्र म्हात्रे यांनी केले. तांत्रिक सहकार्य सौ. नयन पवार यांनी केले. याप्रसंगी आभिनेत्री सौ. नयन पवार, जयश्री फाउंडेशन चे अध्यक्ष कु. वैभव जाधव, हिदुंसम्रटचे नवी मुंबई प्रतिनिधी श्री.महेश घरत,नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे वार्ड ९६चे अध्यक्ष श्री. सोमनाथ बारवे, रायल शालेच्या पिस्पिल सौ. नाझनिन पालेकर व इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


१८ शिक्षकांना सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.