उद्योजक शशिकांत देवदास यांचे निधन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


उद्योजक शशिकांत देवदास यांचे निधन


 


पुणे : प्री-फॅब्रिकेटेड मॉडयूलर किचन क्षेत्रातील आद्य उद्योजक व आदित्य किचन्सचे भागीदार शशिकांत शिवाजीराव देवदास यांचे नुकतेच निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते. त्यांच्यामागे आई शालिनी, पत्नी वंदना, मुलगा अभिषेक, मुलगी स्नेहा, जावई, नातवंंड असा परिवार आहे. आदित्य किचन्सच्या देशभरात २५ फ्रँचायीझीचे जाळे उभारण्यात देवदास यांचे मोलाचे योगदान होते. टेलरमेड किचनचे अचुक उत्पादन करुन दिल्ली ते त्रिवेंद्र्मपर्यंत ग्राहकांना समाधानकारक सेवा पुरवली. आदित्य किचन्सच्या रौप्य महोत्सवी वर्षात अवघ्या ५३ व्या शशिकांत देवदास यांना आलेला अकाली मृत्यू दुःखदायक असल्याचे त्यांचे सहकारी आनंद आंबेकर म्हणाले