पुणे प्रवाह न्युज पोर्टल
स्वराज्यजननी जिजामाता' मालिकेत डॉ. अमोल कोल्हे साकारणार एक खास भूमिका
पुणे :- 'स्वराज्यजननी जिजामाता' ही मालिका सध्या रोमांचक वळणावर आहे. जिजाऊ आणि शहाजीराजांनी स्वराज्यस्थापनेचा विडा उचलला आहे. जिजाऊ शिवबांना घेऊन पुण्यात आल्या आहेत. आता या पुढे मालिकेत प्रेक्षकांना स्वराज्य बांधणीची रोमांचकारी कथा आणि महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास पुन्हा अनुभवायला मिळणार आहे आणि याच दरम्यान प्रेक्षकांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे डॉ. अमोल कोल्हे 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेत एक खास भूमिका साकारणार आहेत. २ आणि ३ सप्टेंबर रोजी डॉ. अमोल कोल्हेंनी भूमिका केलेले भाग प्रसारित होणार आहेत. पाहा स्वराज्यजननी जिजामाता'सोम-शनि., रात्री ८:३० वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर