सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११७ वा पदवीप्रदान समारंभ गुरुवार ३ सप्टेंबर, २०२० रोजी 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११७ वा पदवीप्रदान समारंभ गुरुवार ३ सप्टेंबर, २०२० रोजी 



विविध विद्याशाखांमधील पदवी व पदव्युत्तर स्तरावरील एकूण ७०३५ विद्यार्थ्यांना दिली जाणार पदवी प्रमाणपत्रे  


पुणे, दिनांक ३१ ऑगस्ट २०२० :


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११७ वा पदवीप्रदान समारंभ गुरुवार दिनांक ३ सप्टेंबर, २०२० रोजी संध्याकाळी ४. ३० वाजता ऑनलाईन पद्धतीने व विद्यापीठाच्या काही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमासाठी मा. डॉ. नौशाद डी. फोर्ब्स, सह-अध्यक्ष, फोर्ब्स मार्शल प्रा . लि . हे प्रमुख अतिथी या नात्याने ऑनलाईन पद्धतीने स्नातकांना उद्देशून दीक्षांत भाषण देतील, तसेच मा . राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सुद्धा ऑनलाईन पद्धतीने पदवी प्रदान समारंभात सहभागी होऊन समारंभाचे अध्यक्षीय भाषण देतील.


     सन २०१८-१९ मध्ये व तत्पूर्वी उत्तीर्ण झालेल्या विविध विद्याशाखांमधील पदवी व पदव्युत्तर स्तरावरील एकूण ७०३५ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे वितरीत करण्यात येणार आहेत. त्यापैकी १०४ पीएच. डी. पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेले विद्यार्थी आहेत. सदर पीएच. डी.विद्यार्थ्यांपैकी ७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान समारंभात पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.


     सध्या कोरोना (कोव्हीड - १९) च्या महामारीच्या प्रादुर्भावामुळे सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर पुढील १५ दिवसातमध्ये पोस्टाद्वारे पदवी प्रमाणपत्र पाठविण्यात येणार आहेत.


पदवीप्रदान समारंभ पुढील लिंकवर पाहता येईल : 


http://webcast.unipune.ac.in/convocationSep2020/