पुणे प्रवाह न्युज पोर्टल
भार्गवी चिरमुले दिसणार
जिजाऊंच्या भूमिकेत - 'स्वराज्यजननी जिजामाता' मालिका घेणार लीप
'स्वराज्यजननी जिजामाता' ही मालिका सध्या रोमांचक वळणावर आहे. जिजाऊ आणि शहाजीराजांनी स्वराज्यस्थापनेचा विडा उचलला आहे. शहाजी राजांना बंगळूर प्रांतात जावं लागलं असून जिजाऊ शिवबांना घेऊन पुण्यात आल्या आहेत. आता या पुढे मालिकेत प्रेक्षकांना स्वराज्य बांधणीची रोमांचकारी कथा आणि महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. ही मालिका काही वर्षांचा लीप घेणार असून मालिकेत प्रेक्षकांना नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत.
जिजाऊ माँ साहेबांची भूमिका भार्गवी चिरमुले ही अभिनेत्री करणार आहे, तर शहाजी राजांची भूमिका शंतनू मोघे हा अभिनेता करणार आहे शिवबांच्या भूमिकेत दिवेश मेडगे हा बालकलाकार दिसणार आहे. दिवेशने या आधी स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत छोट्या संभाजीची भूमिका साकारली होती.
स्वराज्य घडवणाऱ्या मुलुखावेगळ्या आईची गाथा 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेत पाहा, सोम-शनि.,
रात्री ८:३० वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर