मराठा समाजाच्या आंदोलनात भीम आर्मी बहुजन एकता मिशन होणार सहभागी.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


प्रति , 


मा. संपादक यासी,



मराठा समाजाच्या वतीने पुण्यात होणाऱ्या आंदोलनात भीम आर्मी ( बहुजन एकता मिशन) सहभागी होणार असून या आंदोलनाला भीम आर्मी जाहीर पाठिंबा देणार आहे.


भीम आर्मी च्या पुणे शहर शाखेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान पुणे स्टेशन येथे गुरुवार,१७ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता तीव्र निदर्शने करून आंदोलन केले जाणार आहे.


या आंदोलनात भीम आर्मीच्या वतीने आरक्षणास पाठिंबा म्हणून ५० फुटी लांब बॅनर केला असून निळे, भगवे झेंडे घेऊन या आंदोलनात सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहे.


तरी आपले पत्रकार , छायाचित्रकार, तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधींनी उपस्थिती राहून सदर बातमीस प्रसिध्दी द्यावी.


ही विनंती.


दत्ता पोळ


प्रदेशाध्यक्ष.


9518780857.