पुणे प्रवाह न्युज पोर्टल
**
पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने नुकतेच पायाभूत सुविधांचे चार प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत. हे प्रकल्प तयार झाले असून, पुणे महापालिकेस हस्तांतरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी दिली.
महिलांसाठी व्यायामशाळा, सामुदायिक शेती संकल्पनेवर आधारित प्लेसमेकिंग पार्क, स्मार्ट क्लिनिक, जलतरण तलाव असे एकूण चार प्रकल्प पुणे स्मार्ट सिटीने पूर्ण केले आहेत.
स्मार्ट सिटी मिशनमध्ये क्षेत्र आधारित विकास कामांअंतर्गत औंध, बाणेर आणि बालेवाडी परिसरात विविध प्रकल्पांचे काम सुरू आहे. त्यापैकी या चार प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे.
सीईओ रुबल अग्रवाल यांनी सांगितले की, "स्मार्ट सिटीकडून पूर्ण करण्यात आलेले प्रकल्प नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील."