प्रधानमंत्री आवास योजनेची* *मुदत पुढील पंधरा दिवस* *वाढवण्यात यावी अशी मागणी*  *पिं-चि.मनपा महापौर उषाताई ढोरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*


*पिंपरी:-* :केंद्रीय गृहनिर्माण व शहरी गरीबी निर्मुलन मंत्रालयाकडील प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गदर्शन सुचनांनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत च – होली , रावेत , व बो – हाडेवाडी येथील आरक्षित जागांवर सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येत आहे . तथापि सदर योजनेकरिता अर्ज भरणेची मुदत ही दि .१७ / ० ९ / २०२० रोजी संपुष्टात येत आहे . तरी ही मुदत पुढील पंधरा दिवस वाढवण्यात यावी अशी मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा ढोरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली आहे.


महापौर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड ही औद्योगिक व कामगार नगरी असून अनेक गोरगरीब कामगार हे पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास आहेत . कोरोना विषाणूचे संकट व लॉकडाऊनमुळे बरेच उद्योग , व्यवसाय हे पूर्वपदावर न आल्याने बऱ्याच गोरगरीब कष्टकरी , कामगार व खाजगी नोकरदार वर्गास जीवन जगण्याची दडपड सुरू आहे . तसेच सध्या रोजगार उपलब्ध नसल्याने त्यांची आर्थिक स्थिती खालावलेली आहे . तसेच सदर योजनेकरिता अर्ज भरण्यास नागरिकांना आधारकार्ड , पॅनकार्ड , मतदान ओळखपत्र , जात प्रमाणपत्र , उत्पन्नाचा दाखला , बँक खाते व इतर संबंधित कागदपत्रे तसेच र.रु .५,००० / – चा डी.डी. देणे आवश्यक आहे .


परंतु शहरातील बहुतांशी नागरिकांची सदर अर्जाची प्रक्रिया अद्याप पुर्ण झाली नसल्याने व अर्ज मुदतीत सादर करणेकामी अडचण निर्माण होत असल्याची बाब निदर्शनास येत आहे . तरी सध्या प्रधानमंत्री आवास योजनेचे अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांका नंतर पुढील पंधरा दिवस मुदतवाढ देण्यात यावी असेही निवेदनात म्हटले आहे.