माजी राष्ट्रपती प्रणवजी मुखर्जी यांचे कार्य हे विद्वत्तापूर्ण होते... आ.डॉ.नीलम गोऱ्हे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


माजी राष्ट्रपती प्रणवजी मुखर्जी यांचे कार्य हे विद्वत्तापूर्ण होते...


आ.डॉ.नीलम गोऱ्हे


**


पुणे दि ०१: देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे ३१ आ्ँगस्ट २०२० रोजी दुःखद निधन झाले. श्री. मुखर्जी आणि शिवसेनेचे अतिशय सलोख्याचे आणि घनिष्ट संबंध होते. शिवसेनेच्या प्रवक्त्या आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेच्या तसेच देशातील आणि महाराष्ट्रातील महिलांच्या वतीने खेद आणि अतिशय दुःख व्यक्त केले. मा.श्री मुखर्जी यांची ज्यावेळेस देशाचे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती होण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. या दरम्यान श्री मुखर्जी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची भेट घेतली होती.यादरम्यान शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा मुखर्जी यांना दिला होतो. श्री. मुखर्जी यांचे देशासाठीचे कार्य अतिशय विद्वत्तापूर्ण व गौरवशाली होते अशा शब्दात आ.डॉ.गोऱ्हे यांनी श्रद्धांजली वाहिली. देशात सत्ता परिवर्तन झाले तरी देखील राष्ट्रपती पदाची जबाबदारी गरिमा संभाळून पूर्ण केली. त्यांच्या निधनाने देशाचे मोठे नुकसान झाले असल्याची भावना आ.डॉ.गोऱ्हे यांनी कै. मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहताना व्यक्त केली.


🌺🌷🌹💐💥🌸🌹🌷🌻💐🌺💥 सा. पुणे प्रवाह परिवारा कडून भावपूर्ण श्रद्धांजली 🌸🌺🍿🌹💥🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


 


Popular posts
संग्राम शेवाळे यांनी विद्यार्थी प्रश्नांसाठी शिष्टमंडळसोबत मा.राज्यपाल महोदय यांची भेट घेतली
Image
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image
*एक वेळ अवश्य भेट द्या* *मराठा वधू-वर* *सूचक केंद्र* *बालिंगे, गगनबावडा रोड, कोल्हापूर ४१६०१०*
Image
महाविकास आघाडीच्या मंत्री मंडळाचा विस्तार
Image
पुण्यातून कलाकार आणि विविध संघटनेची मागणी, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांना च आमदार या पदावर नियुक्ती करण्यात यावी
Image