आयसीएआय'तर्फे ५ व ६ रोजी 'सहकार संवाद'  राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते उद्घाटन; विविध विषयांवर होणार मंथन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल



पुणे : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखा आणि प्रोफेशनल डेव्हलपमेंट कमिटीच्या (पीडीसी) संयुक्त विद्यमाने 'सहकार संवाद' कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शनिवार, दि. ५ आणि रविवार दि. ६ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० ते सायंकाळी ६.०० या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे.


सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे, 'आयसीएआय'चे राष्ट्रीय अध्यक्ष सीए अतुलकुमार गुप्ता, उपाध्यक्ष सीए निहार जांबूसारिया, 'आयसीएआय पीडीसी'चे चेअरमन सीए श्रीनिवास जोशी, केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, माजी सदस्य सीए डॉ. एस. बी. झावरे. डब्ल्यूआयआरसीचे चेअरमन सीए ललित बजाज, सहकार समितीचे चेअरमन सीए यशवंत कासार पुणे आयसीएआयचे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे यांच्यासह सहकार क्षेत्रातील इतर मान्यवर यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. 


हा कार्यक्रम सर्वांना विनामूल्य पाहता येणार आहे. नोंदणीसाठी https://bit.ly/34zEsTX येथे भेट द्यावी, असे आयोजकांनी कळवले आहे. सहकारी बँकांचे ऑडिट, करप्रणाली, सहकार चळवळ आणि अर्थव्यवस्था, सहकार क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचे योगदान, सहकार क्षेत्रात सीएची भूमिका, सहकार क्षेत्र आणि जीएसटी आदी विषयांवर चर्चा होणार आहे, असेही सीए धामणे यांनी सांगितले आहे.


Popular posts
शिवसेना प्रभाग संपर्क अभियानानिमित्त प्रभाग क्रमांक ७ मध्ये श्रीमंत कुसाळकर शेठ यांच्या पुतळ्याला #शिवसेना #शहर_प्रमुख मा #संजय_मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून  सुरुवात केली.*
Image
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी दक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली