पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुणे:- फेब्रुवारी महिन्यामध्ये परीक्षा परिषदेने इयत्ता पाचवी आणि आठवी मधील विद्यार्थी यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली होती.त्याचे निकाल साधारण जून महिन्यात लागतात.पण या कोरोनाच्या काळात अजून जाहीर झाले नाहीत. महाराष्ट्रातील ८ लाख विद्यार्थी यांनी ही परीक्षा दिली आहे.साधारण ६ महिने झाले तरी निकाल जाहीर झाले नाहीत म्हणून विद्यार्थी आणि पालक चिंतेत आहेत.ही माहिती जेव्हा सर्व विद्यार्थी मंडळी यांनी जनता दल (से) विद्यार्थी संघटनचे प्रदेशाध्यक्ष संग्राम शेवाळे यांना सांगितली यांनी लगेच शालेय व शिक्षण मंत्री मा.वर्षाताई गायकवाड यांच्याशी संपर्क साधला.आणि नंतर मंत्रालयात शिक्षण विभागात या बाबतीत संग्राम शेवाळे यांनी संपर्क साधला यावेळी अधिकारी म्हणाले लवकरात लवकर निकाल लागेल अशी ग्वाही दिली.