सूर्यदत्ता फूड बँकेतर्फे गरजुंना धान्य वाटप

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



पुणे : सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या एज्यु-सोशियो कनेक्ट इनिशिएटिव्ह अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या सूर्यदत्ता फूड बँकेच्या वतीने गरजुंना एक महिन्याचे धान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. 'सोशल अफलिफ्टमेंट' उपक्रमांतर्गत सूर्यदत्ता शिक्षण संस्था आणि लायन्स क्लब ऑफ पूना वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडला. गोखलेनगर येथील कामायनी, सदाशिव पेठेतील सेवासदन, जीवनधारा आदी विशेष मुलांच्या संस्थांना एक महिन्याचे रेशन देण्यात आले.


यावेळी सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, अधिष्ठाता प्रा. नूतन जाधव, सीएसआरच्या प्रमुख समन्वयिका सविता गांधी, लायन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी देशमुख, सेवाकार्य प्रमुख सीमा दाबके, सुहास दाबके, दिपाली ठाकर, ऋजुता पितळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित विद्यार्थी व पालकांना मास्क, तसेच अर्सेनिक गोळ्यांचे वाटपही करण्यात आले. यापुढे दर महिन्याला समाजातील गरजू लोकांना अशा स्वरूपात अन्नधान्य वाटण्यात येणार आहे, अध्यक्षा पल्लवी देशमुख, माजी अध्यक्ष व सेवाकार्य प्रमुख सीमा दाबके सुहास दाबके दिपाली ठाकर ऋजुता पितळे असे संयोजकांनी सांगितले.


यावेळी बोलताना प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, "सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गरजुंना मदत व्हावी, या उद्देशाने 'सूर्यदत्ता'ने फुड बँक, क्लोदिंग बँक, प्रॉडक्ट्स बँक, नॉलेज बँक आणि बिझनेस बँक अशा पाच उपक्रमांची सुरुवात केली आहे. यामार्फत विविध प्रकारचे कार्यक्रम घेतले जात असून, समाजातील गरजू, होतकरू, आर्थिक मागास वर्गातील लोकांना, शेतकर्‍यांना, सैन्यदलातील सदस्यांना, नोकरदारांना, दिव्यांग मुलांना मदत दिली जात आहे. सुर्यदत्ता फुड बँकेच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्था, रोजंदारीवरील मजूर, रस्त्यावर राहणारे नागरिक यांच्यासह गरजूंना अन्न व इतर जीवनावश्यक साहित्य पुरवले जात आहे. क्लोदिंग बँकेमार्फत वापरायोग्य कपड्यांचे संकलन, तसेच नवीन कपडे गरजूना पुरविण्यात येत आहेत."