राष्ट्रीय कौशलाचार्य पुरस्काराने 'यशस्वी' संस्था सन्मानित केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाचा पुरस्कार

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



पिंपरी : दिनांक १० सप्टेंबर २०२० : केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय कौशलाचार्य पुरस्काराने पुण्यातील 'यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स' या संस्थेला गौरविण्यात आले. केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मा. डॉ.महेंद्र नाथ पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा दूरदृष्य (ऑनलाईन) प्रणालीदारे संपन्न झाला. अप्रेंटीस योजनेच्या अंमलबजावणीत राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल प्रथम क्रमांकाचा 'राष्ट्रीय कौशलाचार्य' पुरस्कार यावेळी 'यशस्वी' संस्थेला प्रदान करण्यात आला. यावेळी केलेल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलताना डॉ.महेंद्र नाथ पांडे म्हणाले की, देशाच्या विकासात कौशल्य प्रशिक्षणाचे अनन्यसाधारण महत्व असून कौशल्य विकास प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांच्या योगदानामुळे युवापिढी कुशल मनुष्यबळ म्हणून तयार होत आहे. ज्यामुळे उद्योगजगताच्या प्रगतीला वेग मिळत असून उद्योगजगतामधील गुंतवणूक आकर्षित करण्यासाठीही चालना मिळत आहे. आत्मनिर्भर भारतासाठी युवकांनी कौशल्य विकासाची कास धरली पाहिजे असेही डॉ.महेंद्र नाथ पांडे यांनी सांगितले.  


तर हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना 'यशस्वी' संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी सांगितले की, अनुभव नाही म्हणून नोकरी नाही आणि नोकरी नाही म्हणून कामाचा अनुभव नाही या दृष्टचक्रात अडकलेल्या युवकांना अप्रेन्टिस योजनेमुळे प्रत्यक्ष कंपनीत ऑन द जॉब ट्रेनिंग करण्याची संधी उपलब्ध होत असल्याने युवक रोजगारक्षम होत आहेत. देशभरातील तेवीस राज्यात विस्तार असलेल्या 'यशस्वी' संस्थेच्या वतीने सुमारे ७०० नामांकित औद्योगिक कंपन्यांमधून ५५ हजार प्रशिक्षणार्थी प्रत्यक्ष कंपनीत ऑन द जॉब ट्रेनिंग पद्धतीने कार्यरत आहेत. या प्रशिक्षणार्थ्याना कंपनीतर्फे दरमहा विद्यावेतन तसेच कँटीन व वाहतूक सुविधाही उपलब्ध करून देण्यात येते. 


विशेष बाब म्हणजे 'यशस्वी' संस्था अप्रेन्टिस योजनेत प्रामुख्याने ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील गरजू व होतकरू युवक युवतींना प्रवेश देतात. 'यशस्वी' संस्थेचे अनेक विद्यार्थी सध्या नामवंत कंपन्यांमधून ट्रेनी इंजिनिअर म्हणून नोकरीत रुजू झाले आहेत.   


या पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या नवीन संकेतस्थळाचे उद्घाटनही केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मा. डॉ.महेंद्र नाथ पांडे यांच्या


हस्ते करण्यात आले. 


या पुरस्कार सोहळ्याला केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाचे राज्यमंत्री राज कुमार सिंग यांच्यासह अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाचे सचिव प्रविण कुमार यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रशिक्षण महासंचलनालयाच्या महासंचालक नीलम राव यांनी केले.


फोटो ओळ :


१) राष्ट्रीय कौशलाचार्य पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मा. डॉ.महेंद्र नाथ पांडे 


२) 'यशस्वी' संस्थेला अप्रेन्टिस योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय कौशलाचार्य पुरस्कार ऑनलाईन पद्धतीने प्रधान होत असताना . 


३) 'यशस्वी' संस्थेचा लोगो.