कलाकारांचे आमरण उपोषण

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


कलाकारांचे आमरण उपोषण


पुणे :- लॉकडाऊनमुळे सहा महिने सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्यामुळे कलाकार व इतर बॅक स्टेज मंडळींवर उपासमारीची वेळ आली आहे. कलाकारांच्या मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी अभिनेते कुमार पाटोळे हे आमरण उपोषणाला बसले आहेत. महाकलमंडळ मधील कलाकारही यामध्ये सहभागी झाले आहेत हे आंदोलन बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे होत असून महामंडळ या राज्याची शिखर संघटनेच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले व कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया,ऍड मंदार जोशी,अशोकराव जाधव-अध्यक्ष कलाकार केंद्र असोसिएशन हे पाटोळेंच्या सोबत या उपोषणाला बसून पाठिंबा दिला.


  अशा महाकाला मंडळाच्या मागण्या आहेत या सरकारने मान्य कराव्यात व सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास परवानगी द्यावी हि प्रमुख मागणी आहे.                    


       महाकलामंडळ हि संपूर्ण महाराष्ट्रातील चांद्यापासून ते बांद्यापर्यंत ज्या विविध कलाप्रकारातील संस्था आणि कलाकारांची प्रमुख शिखर संस्था आहे.


विद्यमान अध्यक्ष -श्री. मेघराज राजेभोसले


विद्यमान कार्याध्यक्ष - श्री. लक्ष्मीकांत खाबिया


 या शिखर संस्थेची मूळ प्रमुख उद्दिष्टे


१) संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व कलाकार,तंत्रज्ञ,निर्मिते,संस्था यांची शासन दरबारी नोंद करणे.


२) कलाकार म्हणून शासनाचं अधिकृत ओळखपत्र कलाकारांना मिळवून देणं


३) कलाकारांचा आरोग्य विमा ( medical policy ) हि शासनानेच करून दिली पाहिजे हि मुख्य मागणी.


४) कलाकारांची वसाहत वसविण्यासाठी शासनाकडून कमीत कमी दरात एखाद्या भूखंडावर, कलाकरांना घरे बांधून देण्यासाठी आग्रही राहणार


५) ''म्हाडा'' या योगनेमध्ये कलाकारांना घर घेण्यासाठी सवलत मिळावी हि मागणी.


६) शासनाने कलाकारांना जे मानधन देऊ केलंय,त्यासाठीची सध्याची वयोमर्यादा ६० वर्षे आहे. ती वयोमर्यादा कमी करून घेणे.


७) शासनाकडून प्रत्येक कलाकाराला निवृत्तीवेतन (pension) मिळावी.


८) असंघटित कलाकरांना संघटित करून सर्वाना एकाच छताखाली आणणे, ज्या योगे शासनाच्या विविध योजनांचा, सवलतींचा लाभ प्रत्येक कलाकाराला मिळेल.  


कलाकारांच्या निवासाची व्यवस्था प्रत्येक जिल्हा पातळीवर एक कलाकार भवन सारखी वस्तू उभारणे तसेच शासकीय विश्राम गृहात कोणत्याही परवानगी अथवा पत्राशिवाय कलाकारांना गरज भासल्यास निवासाची सोया व्हावी."महामंडळ या शिखरावर संघटनेमध्ये आतापर्यंत १२५ संस्था सहभागी झाल्या असून सुमारे ८. लाख कलाकार एकत्र आले आहेत.


                       "महामहामंडळ"मध्ये ज्या संस्था सहभागी झाल्या आहेत.त्यात चित्रपट,नाट्य ,कलापथक,मराठी वाद्यवृन्द ,हिंदी वाद्यवृन्दा ,लोककलावंत वाघ्या ,मुरली ,गोंधळी ,तुतारीवाद्क,हलगीवादक ,भारुडकलावंत ,आदिवासी कलावंत ,कळसूत्री बाहुली ,कलावंत ,बहुरूपी त्यात सोबत शाहिरी कलावंत ,तमाशा कलावंत ,कलाकेंद्रे चालविणारे कलाकार ,भजनी मंडळे ,बंद पथक तसेच तंत्रज्ञ विभाग .तसेच विदर्भ ,गडचिरोली येथील कला सादर करणारे नाट्य कलाकार , जादूगार ,बोलक्या भाहुल्यांचा खेळ करणारे कलावंत ,पंजाबी ढोल पथक यांचाही सहभाग आहे.


Popular posts
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने कर्जत तालुक्यातील कुपोषित मूले,गरोदर माता विशेष आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात कर्जत,ता.30 गणेश पवार कोरोना आजाराचा फैलाव रोखणेसाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अगंणवाड्या बंद आहेत. अगंणवाड्यात जाणाऱ्या मुलांची तसेच गदोदर महिलाची एका मोहिमेच्या स्वरुपात तपासणी करून अहवाल देण्यात यावे असा आदेश जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी यानी एका पत्राद्वारे दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालूक्यात अगंणवाडी मध्ये जाणारे मूले तसेच गरोदर महिलाची विशेष तपासणी सूरू झाली असून कर्जतचा तालूका आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाचे वतीने ही विशेष मोहिम राबवीली जात आहे.रायगड जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी आधिकारी दिलीप हळदे यानी जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे नावे पत्र काढून जिल्ह्यातील एकुण सर्व्हे झालेल्या 1,तसेच 56,आणि 192 मुलांची तसेच शाळा मध्ये जाणारी मूले व गरोदर महिला याचीआरोग्य तपासणी आणि उपचार करण्याचे आदेश दिले होते . उपमूख्य कार्यकारी (महिला आणि बाल विकास )आधिकारी नितीन मंडलीक यानी कर्जत येथे बैठक घेऊन या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते.तालूका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांनी तालूक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केन्र्दातील आरोग्य अधिकारी यांनी सर्व मूलाचे वजन,उंची घेऊन आरोग्य तपासणी करण्यात यावी असे पत्र काढले.त्यानूसार तालूक्यात 335 अगंणवाड्या मधून कूपोषीत मूले,गरोदर माता याची तपासणी सूरू झाली आहे.पूढिल 20 दिवस नियमीत स्वरूपात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यानी दिली आहे.तालूक्यात आदिवासी विकास विभागाचे वतीने राबविण्यात येत असलेल्या कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रशिन प्रकल्पाचे कार्यकर्ते,आशा वर्कर आणि स्थानिक अगंणवाडी सेविका या तपासणी मोहिमेत सहभागी आहेत.
Image
सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*  Day - ३० 
Image
मा श्री. विनय सुदामपंत शेलुर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांना कोविड १९ महायोद्धा 2020 (KOVID 19 WARRIORS 2020 ) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Image
मा.श्री.शादाब मुलाणी युवासेना पुणे यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी 
Image
शिवसेनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांना अभिवादन