पुणे विभागातील 3 लाख 8 हजार 789 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले,*         *विभागात कोरोना बाधित 3 लाख 96 हजार 714 रुग्ण*                                                            *-विभागीय आयुक्त सौरभ राव*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल   पुणे,दि.24 :- पुणे विभागातील 3 लाख 8 हजार 789 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 लाख 96 हजार 714 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 77 हजार 526 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 10 हजार 399 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.62 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 77.84 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. 


पुणे जिल्हा


  पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 61 हजार 683 रुग्णांपैकी 2 लाख 13 हजार 598 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 42 हजार 242 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 843 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.23 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 81.62 टक्के आहे. 


सातारा जिल्हा


   सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 32 हजार 222 रुग्णांपैकी 22 हजार 212 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 40 आहे. कोरोनाबाधित एकूण 970 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 


सोलापूर जिल्हा


    सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 30 हजार 230 रुग्णांपैकी 21 हजार 206 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 943 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 81 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  


  सांगली जिल्हा


               सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 31 हजार 540 रुग्णांपैकी 21 हजार 501 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 856 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 183 रुग्णांचा मृत्यू झाला आहे


कोल्हापूर जिल्हा


  कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 41 हजार 39 रुग्णांपैकी 30 हजार 272 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 445 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 322 रुग्णांचा मृत्यू झाला आहे 


कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ 


कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 6 हजार 639 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 886, सातारा जिल्ह्यात 708 , सोलापूर जिल्ह्यात 511, सांगली जिल्ह्यात 821 तर कोल्हापूर जिल्ह्यात 713 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.


पुणे विभागातील सर्व्हेक्षण


आजपर्यत विभागामध्ये एकुण 17 लाख 46 हजार 425 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 3 लाख 96 हजार 714 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. 


( टिप :- दि. 24 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )


                         *****


Popular posts
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image
आय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु
शिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....
Image
Shri Sharad Pawar on his 80 Birth-day at his residence Silver Oaks in Mumbai. To personally give the news of an award from U.S.A on the occasion of his Birth-day celebrations
आनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या
Image