आर्थिक वर्ष 21 मधील पहिल्या तिमाहीत गरवारे टेक्निकल फायबर्सच्या निव्वळ नफ्यामध्ये 40.3% घट

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


आर्थिक वर्ष 21 मधील पहिल्या तिमाहीत गरवारे टेक्निकल फायबर्सच्या निव्वळ नफ्यामध्ये 40.3% घट


पुणे, सप्टेंबर 15, 2020: गरवारे टेक्निकल फायबर्स लि. (पूर्वीची गरवारे-वॉल रोप्स लि.) या भारतीय व जागतिक बाजारांसाठी आघाडीची टेक्निकल टेक्स्टाइल उत्पादक असणाऱ्या कंपनीने 30 जून 2020 पर्यंतच्या पहिल्या तिमाहीतील आर्थिक निकाल आज जाहीर केले आहेत. 


कन्सॉलिडेटेड: आर्थिक वर्ष 21 मधील पहिल्या तिमाहीतील ठळक वैशिष्ट्ये


▪ आर्थिक वर्ष 21 मधील पहिल्या तिमाहीत निव्वळ विक्रीमध्ये 34.4% म्हणजे 152.4 कोटी रुपयांपर्यंत घट झाली, या तुलनेत आर्थिक वर्ष 20 मधील पहिल्या तिमाहीत निव्वळ विक्री 232.3 कोटी रुपये होती


▪ आर्थिक वर्ष 21 मधील पहिल्या तिमाहीत करपूर्व नफ्यामध्ये 46.6% म्हणजे 22.6 कोटी रुपयांपर्यंत घट झाली, या तुलनेत आर्थिक वर्ष 20 मधील पहिल्या तिमाहीत तो 42.3 कोटी रुपये होता


▪ आर्थिक वर्ष 21 मधील पहिल्या तिमाहीत निव्वळ करोत्तर नफ्यामध्ये 40.3% म्हणजे 17.7 कोटी रुपयांपर्यंत घट झाली, या तुलनेत आर्थिक वर्ष 20 मधील पहिल्या तिमाहीत तो 29.6 कोटी रुपये होता


▪ आर्थिक वर्ष 21 मधील पहिल्या तिमाहीत ईपीएस 8.08 रुपये होते; या तुलनेत आर्थिक वर्ष 20 मधील पहिल्या तिमाहीच्या तुलनेत 40.3% घट झाली


   व्यवस्थापनाची प्रतिक्रिया:


       निकालांविषयी मते व्यक्त करताना, गरवारे टेक्निकल फायबर्स लि.चे सीएमडी वायू गरवारे म्हणाले, कोविड 19 मुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनचा परिणाम होऊन पहिल्या तिमाहीमध्ये व्यवसायावर गंभीर परिणाम झाला. देशभर उत्पादन आणि विक्री यांना खीळ बसली. लॉकडाउनच्या काळात आम्ही कठोर एसओपी व नियमित संवाद या माध्यमातून आरोग्याला आणि आमच्या टीमच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याला प्राधान्य दिले. आम्ही रिसिव्हेबलचे संकलन, खर्चामध्ये कपात व कॅश फ्लो यावर भर दिला. पहिल्या तिमाहीच्या नंतरच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने उत्पादनाला सुरुवात झाली. देशांतर्गत बाजारामध्ये फारशी हालचाल झाली नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात आम्ही हळूहळू पुरवठा सुरू केला आणि त्यामुळे आव्हाने पेलत असूनही कामगिरी करत राहिलो.


गरवारे टेक्निकल फायबर्स लि.विषयी (अगोदरची गरवारे-वॉल रोप्स लि.): (BSE: 509557 / NSE: GARWALLROP)


          गरवारे टेक्निकल फायबर्स लि. (अगोदरची गरवारे-वॉल रोप्स लि.) ही आयएसओ 14001:2015 व आयएसओ 9001:2015 प्रमाणित कंपनी टेक्निकल टेक्स्टाइलमधील आघाडीची कंपनी असून, ती जगभरातील ग्राहकांना कस्टमाइज्ड सेवा देते. जगभर कंपनी क्रीडा, फिशरीज, अॅक्वाकल्चर, शिपिंग, कृषी, कोटेड फॅब्रिक्स व जिओसिंथेटिक्स या क्षेत्रांतील नावीन्यासाठी प्रसिद्ध आहे. गरवारे टेक्निकल फायबर्स लि. उत्पादनांची निर्मिती वाई व पुणे येथील अद्ययावत प्रकल्पांमध्ये केली जाते आणि जगभरातील 75 हून अधिक देशांमध्ये विक्री केली जाते.


अधिक माहितीसाठी पाहा http://www.garwarefibres.c