पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुणे,दि.2 :- पुणे विभागातील 2 लाख 44 हजार 499 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 80 हजार 345 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 57 हजार 632 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 6 हजार 522 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.67 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 73.76 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 73 हजार 747 रुग्णांपैकी 1 लाख 35 हजार 39 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 34 हजार 636 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 72 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.34 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 77.72 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 14 हजार 658 रुग्णांपैकी 7 हजार 778 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 466 आहे. कोरोनाबाधित एकूण 414 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 18 हजार 426 रुग्णांपैकी 14 हजार 8 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 659 आहे. कोरोनाबाधित एकूण 759 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 13 हजार 162 रुग्णांपैकी 7 हजार 687 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 956 आहे. कोरोनाबाधित एकूण 519 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 24 हजार 506 रुग्णांपैकी 15 हजार 833 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 915 आहे. कोरोनाबाधित एकूण 758 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 6 हजार 563 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 433, सातारा जिल्ह्यात 661, सोलापूर जिल्ह्यात 262, सांगली जिल्ह्यात 1 हजार 384 तर कोल्हापूर जिल्ह्यात 823अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 11 लाख 59 हजार 411 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 44 हजार 499 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 1 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
***