पुणे प्रवाह न्युज पोर्टल
स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. काळ्या रंगाचा द्वेष करणारी सौंदर्या दीपाचाही तिरस्कार करते. कार्तिकचं दीपावर प्रेम आहे हे कळल्यापासून ते दोघं कसे एकत्र येणार नाहीत याची सौंदर्याने पुरेपुर काळजी घेतली. कार्तिकच्या मनाचा जराही विचार न करता ऐन लग्नातही सौंदर्याने कारस्थान रचत कार्तिकचं लग्न दीपाऐवजी श्वेताशी करण्याचा डाव रचला. अर्थात लावण्यामुळे सौंदर्याचा हा डाव उधळला गेला आणि सौंदर्याच्या घरात दीपाने सून म्हणून पाऊल ठेवलं. पण सौंदर्याचं सूडचक्र इथेही थांबलं नाही. दीपा-कार्तिकला एकमेकांपासून दूर ठेवण्याचे तिचे प्रयत्न अखंड सुरु आहेत. दीपासमोर सौंदर्याचं खरं रुप समोर आलंच आहे. आता वेळ आलीय ती कार्तिकसमोर हे सत्य उघड होण्याची. कार्तिकला आपल्या आईचं कारस्थान कळेल का? हे पहाणं उत्सुकतेचं असणार आहे. ‘रंग माझा वेगळा’ मालिकेचे यापुढील भाग मनोरंजनाने परिपूर्ण असणार आहेत.
२० सप्टेंबरला दुपारी १२ आणि सायंकाळी ७ वाजता महाएपिसोडमध्ये सौंदर्याचा महाड्रामा कार्तिकसमोर येणार आहे. तेव्हा पाहायला विसरु नका रंग माझा वेगळा मालिकेचा हा विशेष भाग.