पुणे विभागातील 1 लाख 93 हजार 379 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले,         विभागात कोरोना बाधित 2 लाख 57 हजार 206 रुग्ण                                                            -विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



  पुणे,दि.04 :- पुणे विभागातील 1 लाख 93 हजार 379 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 लाख 57 हजार 206 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 57 हजार 9 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 6 हजार 818 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.65 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 75.18 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. 


पुणे जिल्हा


  पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 81 हजार 69 रुग्णांपैकी 1 लाख 44 हजार 961 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 31 हजार 886 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 222 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.33 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 80.6 टक्के आहे. 


सातारा जिल्हा


   सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 15 हजार 960 रुग्णांपैकी 9 हजार 21 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 496 आहे. कोरोनाबाधित एकूण 443 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 


सोलापूर जिल्हा


    सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 19 हजार 324 रुग्णांपैकी 14 हजार 524 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 17 आहे. कोरोनाबाधित एकूण 783 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  


  सांगली जिल्हा


               सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 14 हजार 613 रुग्णांपैकी 8 हजार 90 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 957 आहे. कोरोनाबाधित एकूण 566 रुग्णांचा मृत्यू झाला आहे


कोल्हापूर जिल्हा


  कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 26 हजार 240 रुग्णांपैकी 16 हजार 783 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 653 आहे. कोरोनाबाधित एकूण 804 रुग्णांचा मृत्यू झाला आहे 


कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ 


कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 6 हजार 556 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 787, सातारा जिल्ह्यात 713, सोलापूर जिल्ह्यात 442 , सांगली जिल्ह्यात 716 तर कोल्हापूर जिल्ह्यात 898 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.


पुणे विभागातील सर्व्हेक्षण


आजपर्यत विभागामध्ये एकुण 12 लाख 26 हजार 978 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 57 हजार 206 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. 


( टिप :- दि. 3 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )


                         *****