पुणे विभागातील 1 लाख 70 हजार 431 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले, विभागात कोरोना बाधित 2 लाख 33 हजार 854 रुग्ण ... विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे प्रवाह न्युज पोर्टल   पुणे,दि.31 :- पुणे विभागातील 1 लाख 70 हजार 431 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 लाख 33 हजार 854 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 57 हजार 217 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 6 हजार 206 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.65 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 72.88 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. 


पुणे जिल्हा


  पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 68 हजार 381 रुग्णांपैकी 1 लाख 29 हजार 629 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 34 हजार 809 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 943 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.34 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 76.99 टक्के आहे. 


सातारा जिल्हा


   सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 13 हजार 508 रुग्णांपैकी 7 हजार 208 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 918 आहे. कोरोनाबाधित एकूण 382 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 


सोलापूर जिल्हा


    सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 17 हजार 801 रुग्णांपैकी 13 हजार 221 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 844 आहे. कोरोनाबाधित एकूण 736 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  


  सांगली जिल्हा


               सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 11 हजार 92 रुग्णांपैकी 6 हजार 26 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 620 आहे. कोरोनाबाधित एकूण 446 रुग्णांचा मृत्यू झाला आहे


कोल्हापूर जिल्हा


  कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 23 हजार 72 रुग्णांपैकी 14 हजार 347 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 26 आहे. कोरोनाबाधित एकूण 699 रुग्णांचा मृत्यू झाला आहे 


कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ 


कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 5 हजार 916 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 856, सातारा जिल्ह्यात 620, सोलापूर जिल्ह्यात 386 , सांगली जिल्ह्यात 357 तर कोल्हापूर जिल्ह्यात 697 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.


पुणे विभागातील सर्व्हेक्षण


आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 68 हजार 119 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 33 हजार 854 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. 


( टिप :- दि. 30 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )


                         *****


Popular posts
राम उत्तम गालफाडे मा. पोलीस अधिकारी यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी
Image
जनशक्ती विकास संघाच्या पश्चिम महाराष्ट्र कोअर कमिटी अध्यक्षपदी छाया भोसले यांची नियुक्ती
Image
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट पुणे यांच्या वतीने २०० PPE किट आणि ४०० लिटर सॅनिटाइजर ससून हॉस्पिटलला सुपूर्त 
Image
४४.६% भारतीय विद्यार्थ्यांची ‘स्कूल फ्रॉम होम’ पर्यायास पसंती: ब्रेनली
Image
माजी विरोधी पक्षनेते, नगरसेवक कै. श्री दत्ता (काका) साने वय वर्षे ४७ यांचे दुःखद निधन झाले
Image