पुणे फेस्टिवलच्या श्रीं ची प्रतिष्ठापना संपन्न मुख्यमंत्री निधीस दोन लाख रूपयांची मदत

पुणे प्रवाह न्युज पोर्टल Celebratin


कृपया प्रसिद्धिसाठी


 


३२ व्या पुणे फेस्टिवलच्या श्रीं ची प्रतिष्ठापना आज हॉटेल सारस, नेहरू स्टेडियम येथे सकाळी १०.०० वाजता विधीवत संपन्न झाली. यासाठी माफक आरास करण्यात आली असून, वेदमूर्ती पं. धनंजय घाटे गुरूजी यांनी पौराहित्य केले. याप्रसंगी पुणे फेस्टिवलचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. "कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या पुणे फेस्टिवलचे सर्व कार्यक्रम रद्द केले असून, या आपत्तीच्या निमित्ताने पुणे फेस्टिवलतर्फे मुख्यमंत्री निधीस दोन लाख रूपयांच्या मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्त करण्यात येत आहे." असे पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी सांगितले. कळवा.