कोरोनाबाधित मृतदेहांवर अत्यंसंस्कार करणाºयांचा सन्मान भवानी पेठेतील श्री शिवाजी मित्र मंडळ ट्रस्ट : श्री गणेश कृतज्ञता पुरस्कार प्रदान

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


कोरोनाबाधित मृतदेहांवर अत्यंसंस्कार करणाºयांचा सन्मान


भवानी पेठेतील श्री शिवाजी मित्र मंडळ ट्रस्ट : श्री गणेश कृतज्ञता पुरस्कार प्रदान


 


पुणे : मानवी जीवनात अंतिम संस्कार हा सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा संस्कार आहे. परंतु कोरोनामुळे मृत पावलेले अनेक मृतदेह अंतिम संस्काराच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांच्या जवळचे नातेवाईक देखील यासाठी पुढे येत नाहीत. अशावेळी समाजातील असे लोक जे जाती-धर्माची बंधने झुगारुन अशा मृतदेहांवर अत्यंसंस्कार करतात,अशा हातांचा सन्मान श्री गणेश कृतज्ञता पुरस्कार देऊन करण्यात आला. 


      भवानी पेठेतील श्री शिवाजी मित्र मंडळ ट्रस्टच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सदाशिव कुंदेन, साईनाथ मंडळ ट्रस्टचे पीयुष शाह, प्रकाश बालानी, मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद थोरात यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. जावेद खान, शब्बीर शेख, अरुण जंगम, मीरा जंगम, बेबीताई महादेव केदारे, आय.टी.शेख, सगाई राजेश नायर, अंजुम इनामदार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह व शाल असे पुरसकाराचे स्वरूप होते. कार्याध्यक्ष गोविंदा वरंदानी, गणेश गोळे, सुहास जगताप, हसिम खान, विजय पुर्सनानी यांनी सहकार्य केले. 


सदाशिव कुंदेन म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात डॉक्टर, नर्सेस आणि हॉस्पिटल मधील कर्मचाºयांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपली जबाबदारी पार पाडत आहेत. कोरोनामुळे मृत झालेल्या अनेक मृतदेहांवर अंतिम संस्कारासाठी वाट पाहण्याची वेळ आली होती. परंतु समाजातील काही व्यक्ती पुढे आले आणि कशाचीही पर्वा न करता कोरोनाबाधित मृतदेहांवर अत्यंसंस्कार केले. अशा व्यक्तींचा सन्मान करणे ही अभिमानाची गोष्ट आहे. विकास भांबुरे यांनी सुत्रसंचालन केले. प्रल्हाद थोरात यांनी आभार मानले.


*फोटो ओळ - भवानी पेठेतील श्री शिवाजी मित्र मंडळ ट्रस्टतर्फे कोरोनाबाधित मृतदेहांवर अत्यंसंस्कार करणाºयांचा सन्मान श्री गणेश कृतज्ञता पुरस्कार देऊन करण्यात आला.