पुणे शहरामध्ये उद्भवलेल्या कोरोना विषाणु चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरच्या गणपती चे घरीच विसर्जन करावे आणि सार्वजनिक मंडळातील गणेश मूर्तीचे मंडपात विसर्जन करावे असे आवाहन मा. मुरलीधर मोहोळ महापौर, पुणे यांचे कडून करण्यात आले आहे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


**.


पुणे :- कोरोना पार्श्वभूमीवरील गणेश विसर्जनाबाबत..


पुणे शहरामध्ये उद्भवलेल्या कोरोना विषाणु चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरच्या गणपती चे घरीच विसर्जन करावे आणि सार्वजनिक मंडळातील गणेश मूर्तीचे मंडपात विसर्जन करावे असे आवाहन मा. मुरलीधर मोहोळ महापौर, पुणे यांचे कडून करण्यात आले आहे.


सदर आवाहनास पुणेकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असुन अनेकांनी दीड दिवसाच्या घरच्या श्री गणेश मूर्तीचे विसर्जन घरीच केले. पुणे महानगरपालिकेने एका क्षेत्रिय कार्यालयात दोन या प्रमाणे तीस पर्यावरण पुरक श्री गणेश विसर्जन फिरते होद नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. ज्यांना घरी विसर्जन करणे शक्य झाले नाही अश्या सुमारे ६७९ नागरिकांनी पालिकेने उपलब्ध करून दिलेल्या या फिरत्या हौदामध्ये श्री गणेश मूर्ती विसर्जन केले. 


सन २०१९ साली एकुण १३८५८ मूर्तीचे दुसऱ्या दिवशी विसर्जन व दान करण्यात आले होते. यंदाच्या वर्षी फक्त ६७९ मूर्ती या फिरत्या विर्सजन हौदामध्ये विसर्जित केल्या गेल्या व ६१० मूर्ती दान करण्यात आल्या त्याबद्दल मा.महापौर यांनी समस्त पुणेकरांचे जाहिर आभार मानले आणि उर्वरित राहिलेल्या सर्व नागरिकांना श्री गणेश मूर्तीचे विसर्जन घरीच करण्याचे आवाहन केले आहे.