आमदार नीलमताई गोऱ्हे आणि शिवसैनिकांने घेतलेल्या तात्काळ निर्णयाने एका व्यक्तीचे प्राण वाचले.......

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


#*आ.नीलम गोर्हे व्हिडीओ मराठी


*काल २३/८/२०ला संध्याकाळी शिवसेनेचे कार्यकर्ते गौरव गुळवणी यांचा विटा सांगली तून मेसेज आला. की पुण्यातील एका व्यक्तीने फेसबुक वरती आत्महत्या करत असल्याबाबत मेसेज टाकलेला आहे. त्यानंतर त्याचं गांभीर्य लक्षात आल्याबरोबर पुण्याचे पोलिस आयुक्त व्यंकटेशन व


पोलीस उपायुक्त श्री सरदेशमुख यांना तात्काळ कल्पना दिली व पुण्यातील शिवसैनिक किरण साळी यांना संबंधित व्यक्तीला संपर्क साधायला सांगितले. त्यामुळे तो करत असलेला कृत्यापासुन त्याला परावृत्त करण्यात आले. त्यामुळे सदर व्यक्तीचा जीव वाचला याचं नक्कीच समाधान आहे. तसेच पोलीस व मी समाधानी आहे.