पुणे प्रवाह न्युज पोर्टल
_*उपमुख्यमंत्री कार्यालय,*_
_*मंत्रालय, मुंबई*_
दि. 16 ऑगस्ट 2020.
मुंबई, दि. 16: माजी क्रिकेटपटू अर्जुन पुरस्कार विजेते चेतन चौहान यांच्या निधनाने उमदा क्रिकेटपटू हरपला आहे, भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आपल्या वैशिष्टयपूर्ण खेळीने त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली होती, आशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात, सत्तरच्या दशकात भारताचे प्रतिनिधित्व करताना क्रिकेटपटू चेतन चौहान यांनी लिटील मास्टर सुनील गावस्कर यांच्या सोबत अनेकवेळा भारतीय डावाची यशस्वी सुरुवात केली होती. ही जोडी त्याकाळी खूप प्रसिद्ध होती. चेतन चौहान उत्तरप्रदेशात जरी जन्मले असले तरी वडिलांच्या सैन्य दलातील नोकरीच्या निमित्ताने त्यांचे तरुणपण पुण्यात गेले, येथेच त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. त्यांची पुण्याशी नाळ खूप घट्ट होती. त्यांनी रणजीमध्ये अनेक वर्षे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर त्यांनी भारतीय क्रिकेट टीममध्ये आपल्या वैविध्यपूर्ण खेळाने ठसा उमटवला. निवृत्तीनंतर त्यांनी 'बीसीसीआय'मध्ये ही काम केले. तसेच उत्तर प्रदेशममधून राजकीय जीवनाला सुरुवात केली. चेतन चौहान यांचे क्रिकेट क्षेत्रासह राजकीय क्षेत्रातील योगदान क्रिकेट रसिकांसह सामान्य जनतेच्या कायम स्मरणात राहील.
*****