पुढील सात दिवस कोरोना रुग्णदर कमी झाल्यास पुण्यातील परिस्थिती

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


नियंत्रणात - 


पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळ दहिहंडी उत्सवानिमित्त आॅक्सिजन कॉन्संटेÑटर उपकरणांची भेट 


 


पुणे : कोरोनाचे रुग्ण रुग्णालयातून घरी जाण्याची संख्या वाढत आहे. गणपती बाप्पाच्या कृपेने आपण या संकटावर मात करुच. अनेक रुग्ण घरी विलिगीकरण करण्याचा पर्याय देखील निवडत आहेत. त्यामुळे त्यांची योग्य काळजी देखील घेतली जात आहे. जेवढी कोविड केअर सेंटर रिकामी होतील, तेवढे आपण यशस्वी होऊ. पुढील सात दिवसात कोरोना रुग्णांचा दर कमी झाल्यास कोरोनाचा दर कमी झाला असे म्हणता येईल, असे पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले. 


 


श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा दहिहंडी उत्सव रद्द करुन पुणे महापालिकेला २ आॅक्सिजन कॉन्संटेÑटर उपकरणे देण्यात आली. बुधवार पेठेतील कोतवाल चावडीजवळ झालेल्या कार्यक्रमाला स्थायी समिती अध्यक्ष व ट्रस्टचे उत्सवप्रमुख हेमंत रासने, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, सचिन आखाडे, अक्षय गोडसे, यतिश रासने, तुषार रायकर आदी उपस्थित होते. सुमारे १ लाख २५ हजार रुपयांची उपकरणे आयुक्तांकडे सुपूर्द करण्यात आली. 


 


विक्रम कुमार म्हणाले, पुण्यामध्ये आणि पिंपरी-चिंचवडमध्ये प्रत्येक एक जंबो हॉस्पिटल साकारण्यात येत आहे. सुमारे ८०० बेडची ही रुग्णालये असणार आहेत. भविष्यात जंबो हॉस्पिटलची गरज पडली नाही, तर चांगलेच आहे. मात्र, त्याची व्यवस्था असणे गरजेचे आहे. आजमितीस कोरोनामुळे होणारा मृत्युदर हा २.५ इतका आहे, तो १ च्या खाली येणे गरजेचे आहे. दगडूशेठ गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळाने गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवाबाबत घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. रुग्णालयांना मंडळाने दिलेले २ आॅक्सिजन कॉन्संटेÑटर उपकरणे अत्यंत उपयुक्त आहेत. 


 


प्रकाश चव्हाण म्हणाले, सध्याचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परंपरागत साजरा होणारा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, पुणे सुवर्णयुग तरुण मंडळ दहीहंडी उत्सव रद्द करून उत्सवावर खर्च होणा-या रकमेतून सामाजिक बांधिलकी जपत पुणे महानगरपालिकेच्या रुग्णालयास कायमस्वरूपी उपयोगी पडेल असे दोन आॅक्सिजन कॉन्संट्रेटर उपकरण दिले आहेत. ही मदत नसून आम्ही आमचे कर्तव्य पार पाडले आहे.


 


* फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा दहिहंडी उत्सव रद्द करुन पुणे महापालिकेला २ आॅक्सिजन कॉन्संटेÑटर उपकरणे देण्यात आली. बुधवार पेठेतील कोतवाल चावडीजवळ झालेल्या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर.