हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त पहिल्या ‘ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सवा’त भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त पहिल्या ‘ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सवा’त भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी


 


 


 


- 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान गणेशभक्तांना विनामूल्य घेता येणार ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सवाचा आनंद - उत्सवप्रमुख पुनीत बालन यांची माहिती


 


- ‘गण – संवाद’ आणि ‘गण – संगीत’ मधून उलगडणार उत्सव श्री गणेशाचा, महोत्सव कलांचा


 


- ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठा मंदिरात आणि दर्शन ऑनलाईन


 


 


 


पुणे, दि. 20 – श्री गणरायांचे आगमन म्हणजे आनंद सोहळा. अवघ्या दोन दिवसांवर आलेला हा आनंदोत्सव द्विगुणित करण्यासाठी हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त पहिला ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सव 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2020 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या ऑनलाईन महोत्सवात गणेशभक्तांना ‘गण – संवाद’ आणि ‘गण – संगीत’ अशा स्वरुपात भरगच्च कार्यक्रमांची सांस्कृतिक मेजवानी विनामूल्य मिळणार आहे अशी माहिती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी दिली.


 


 


 


शनिवारी सकाळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ची प्राणप्रतिष्ठा सालाबादप्रमाणे मंदिरात होईल, श्री गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या शुभहस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. उत्सव मोठा नसला तरी सर्व धार्मिक विधी पारंपारिक पद्धतीने केले जाणार आहेत. पहिल्या ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सवाबद्दल माहिती देताना श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे उत्सवप्रमुख पुनीत बालन म्हणाले, गणेशोत्सव हा आनंदाचा, उत्साहाचा, समाजात नवचैतन्य निर्माण करणारा उत्सव आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजात सध्या काही प्रमाणात निराशेचे वातावरण निर्माण झालेले आहे, गणपती बाप्पाच्या आगमनाबरोबर वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. पुण्याने जगाला सार्वजनिक गणेशोत्सव दिला, त्या गणेशोत्सवाची ओळख विधायक कार्यासाठी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती यांच्या वतीने विधायकतेला आधुनिकतेची जोड देत पहिल्या ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे. पहिल्या ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सवात ‘गण - संवाद’ च्या माध्यमातून मान्यवर आपल्या खास शैलीत त्यांनी अनुभवलेला पुण्याचा गणेशोत्सव, गणपती बाप्पा आणि त्यांचे नाते यासह त्यांचा प्रवास उलगडणार आहेत तर ‘गण- संगीत’ मध्ये दिग्गज कलावंत आपली कला सादर करून गणेशभक्तांना मंत्रमुग्ध करणार आहेत. या सांस्कृतिक महोत्सवाचे ऑनलाईन प्रसारण 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2020 दरम्यान दररोज सायंकाळी 7.00 वाजता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या www.bhaurangari.com या अधिकृत संकेतस्थळावर आणि दुपारी 3.30 एबीपी माझा वर वाजता होणार आहे.


 


 


 


पहिल्या ऑनलाईन महोत्सवातील सांस्कृतिक मेजवानी पुढील प्रमाणे


 


22 ऑगस्ट – लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रविण तरडे (मुलाखत)


 


23 ऑगस्ट – पुण्यनगरीचे महापौर मा. मुरलीधर मोहोळ (मुलाखत)


 


24 ऑगस्ट - ‘लिटिल चॅम्प’ फेम युवा गायक प्रथमेश लघाटे, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन आणि विराज जोशी (गायन)


 


25 ऑगस्ट - पद्मश्री पं. विजय घाटे आणि राकेश चौरसिया (वादन)


 


26 ऑगस्ट - . लोककलावंत नंदेश उमप आणि डॉ. गणेश चंदनशिवे (गायन)


 


27 ऑगस्ट – पुण्याचे सह-पोलिस आयुक्त मा. डॉ. रवींद्र शिसवे (मुलाखत)


 


28 ऑगस्ट – युवा उद्योजक आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन (मुलाखत)


 


29 ऑगस्ट - गायक, संगीतकार डॉ. सलिल कुलकर्णी (गायन)


 


30 ऑगस्ट – गायक राहुल देशपांडे (गायन)


 


31 ऑगस्ट – संगीतकार अजय – अतुल (मुलाखत)


 


1 सप्टेंबर - गायक, संगीतकार शंकर महादेवन (गायन)


 


 


 


पहिल्या ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सवातील कार्यक्रमांचे निवेदन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, श्रुती मराठे, भार्गवी चिरमुले, मिलिंद कुलकर्णी आणि विनोद सातव करणार आहेत. हा सांस्कृतिक महोत्सव पुण्यासह जगभरातील सर्व गणेशभक्तांना विनामूल्य अनुभवता येणार आहे, गणेशभक्तांनी घरी सुरक्षित राहून उत्सव साजरा करावा व या पहिल्या ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी केले आहे.