शाहिर वामनदादा कर्डक यांना जन्मदिनानिमीत्त                    विनम्र अभिवादन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


🚩 🚩


 


            वामनदादा कर्डक यांचा जन्म १५ आॅगस्ट १९२२ रोजी सिन्नर तहसीलच्या देसवंडी जिल्हा नाशिक येथे झाला. ते एक मराठी लोकशाहीर,लोककवी व आंबेडकर चळवळीतील आघाडीचे कार्यकर्ते होते.  


           लोकशाहीर वामनदादा कर्डक यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्या ओजस्वी वाणीतून आणि समर्थ लिखाणातून महाराष्ट्राच्या घराघरात, खेड्यापाड्यात, वाडीतांड्यात पोहोचवण्याचे काम केले .बुद्ध ,फुले ,आंबेडकर यांचा विचार हा वामनदादा यांचा श्वास होता ,ऊर्जा केंद्र होते. हे विचार प्रभावीपणे प्रसारित करत, वामनदादा जिवनाच्या शेवटपर्यंत फिरत राहिले. त्यामुळे समाज जागृत होत राहिला. त्यावेळी आंबेडकरी चळवळ सर्वत्र वेगाने जोर धरू लागली होती. आंबेडकरांचे अनुयायी समतेच्या लढ्यात उतरले होते.वामनदादाही बाबासाहेबांच्या सभेला जात. समता सैनिक दलातील तरुणांसोबत काठीला काठी लावून बाबासाहेबांना सभास्थानी जायला रस्ता करून देत. नायगाव येथे १९४३ साली वामनदादा कर्डक यांनी बाबासाहेबांना प्रथम पाहिले होते.


               वामनदादा कर्डक यांनी स्वातंत्र्योत्यर काळात जनजागृती बरोबर मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या गीतलेखनाने वेगळाच ठसा ऊमटवला.  


 वामनदादांच्या खालील गीताने खरच येडे केले होते …


अहो सांगा या वेड्याला, माझ्या घरधन्याला कशी जाऊ सांगा मी सासुरवाडीला( चित्रपट सांगते ऐका, )


त्यांनी सुमारे चार हजारांवर गाणी लिहिली.


 


" चल ग हरिणी तुरु तुरू चिमण्या उडती भुरू भुरू


अशी सुंदर लोकगीत रचणारे


वामन तबाजी कर्डक यांची आज जयंती.


          मराठी चित्रपटसृष्टीतला विक्रमी चित्रपट. सांगत्ये ऐका' या चित्रपटाचा रौप्यमहोत्सव झाल्यावर दिग्दर्शक अनंत माने यांच्या डोक्‍यात एक कल्पना आली, की या चित्रपटात एक नवे गाणे टाकावे.


त्यांनी ही कल्पना संगीतकार वसंत पवार यांना बोलून दाखवली. माने यांचा वसंत पवार यांच्या संगीतावर विश्‍वास होता. तशीच त्यांची साहित्यिक जाणही माहीत होती. त्यामुळे त्यांनी वसंत पवार यांनाच नवं गाणं निवडायचं स्वातंत्र्य दिलं. वसंत पवारांनी शाहीर वामनदादा कर्डक यांचं गीत निवडलं.


त्यांच्या हयातीतच त्यांचे चार काव्यसंग्रह प्रकाशित झाले होते.त्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. त्यांचे वडील मोळया विकणे, टेंभुच्या पानाचे विडे करुन विकणे आणि होडीचा व्यवसाय करीत.


आंबेडकर चळवळीचे अनुयायी असलेले लोककवी वामनदादा कर्डक हे वसंत पवारांचे (संगीतकार )मित्र होते. शाळा शिकण्याचे भाग्य नशिबी नसल्यामुळे ते अनेक वर्षे निरक्षर होते. समता दलात वामनदादा लेझीम व लाठीकाठी शिकवत. 


मुंबईला बी.डी. चाळीत एक माणूस आलेले पत्र घेऊन वाचण्यासाठी दादांकडे आला व म्हणाला, मास्तर एवढं पत्र वाचून दाखवा.' वामनदादांनाच काय पण आजूबाजूच्या कुणालाच पत्र वाचता आलं नाही. त्यामुळे त्या माणसाच्या मनाची झालेली तगमग पाहून दादांच्या डोळ्यांत पाणी आलं. त्यांनी साक्षर व्हायचं ठरवून त्यांचे अधिकारी देहलवी साहेब यांच्याकडून जिद्दीने अक्षरओळख करून घेतली. पुढे दादांनी डॉ. आंबेडकरांचे विचार गाण्यांमधून सर्वांपर्यंत पोचवायचा विडा उचलून, संपूर्ण महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात येथे जाऊन आपल्या आवाजाचा करिष्मा दाखवला.


         त्यांनी सुमारे चार हजारांवर गाणी लिहिली.


कर्डकांनी लहानपणी गुरे चारणे, जत्रेत कुस्त्या खेळणे, शिवडी येथे गिरणी कामगाराची नोकरी करणे, मातीकाम, सिमेंट काँक्रीटचे काम, चिक्की विकणे, आईसफ्रूट विकणे, खडी फोडणे, टाटा ऑईल मिल मध्ये नोकरी, इत्यादी व्यवसाय केले. त्यांना वाचनाचा छंद असून त्यांनी लल्लाट लेख या नाटकात घुमा या पात्राची भूमिका केली होती.


वामनदादा कर्डक यांनी ३ मे १९४३ रोजी पहिले विडंबन गीत लिहिले व त्यानंतर २००४ पर्यंत गीतलेखन व गायनाचा कार्यक्रम चालू ठेवला.. 


त्यांच्या प्रकाशित आणि अप्रकाशित मिळून साधारणतः दहा हजाराच्या आसपास गीतरचना असल्याचा अंदाज आहे. 


कर्डकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना १९४० साली नायगांव येथे पाहिले व त्यानंतर चाळीसगांव, मनमाड, टिळकनगर येथे त्यांनी आंबेडकरांच्या भाषणांत गायन केले.त्यांनी अनेक आंबेडकरी चळवळीशी निगडीत काव्य रचना केल्या . 


 


त्यांची काव्य संपदा 


‘वाटचाल’ (गीतसंग्रह) १९७३


‘मोहळ’ (गीतसंग्रह) १९७६


‘हे गीत वामनाचे’ (गीतसंग्रह) १९७७


‘माझ्या जीवनाचं गाणं’ (आत्मकथन) १९९६


ध्वनिफिती व चित्रपट गीते


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट


भीमज्योत


जय भीम गीते


सांगा या वेडीला माझ्या गुलछडीला (चिय्त्रपत - सांगत्ये ऐका)


चल गं हरणे तुरू तुरू (चित्रपट - पंचारती)


चरित्र


एका कवीचे जीवनगाणे - वामन कर्डक यांची चरित्रकथा (लेखक -बबन लोंढे)


ह्यो ह्यो ह्यो पाहुणा, शकुचा मेहुणा


तुझ्याकडे बघुन हसतोय ग


काही तरी घोटाळा दिसतोय ग


काही तरी बाई घडलंय खरं


फंदात पाखरू पडलंय खरं


मधावर माशी बसावी जशी


तसाच बिलगून बसतोय ग


प्रेमाचा फासा टाकून असा


आपलासा हा केलास कसा?


नवतीच्या नूरा भुललाय पुरा


जाळ्यात मासा हा फसतोय ग


गुळाला मुंगळा चिटकुन बसं


मेतकुट तुमचं दिसतंय तसं


होशील का राणी, लागुनी कानी


असंच काही तरी पुसतोय ग


तुझी नि त्याची तुटावी जोडी


अमृताची विटावी गोडी


म्हणून हा मेला, वामनचा चेला


मोठं मोठं डोळं वासतोय ग 


वसंत शिंदे व लीला गांधी यांचेवर चित्रित झालेला सांगत्ये ऐका मधील झगडा 


सांगा या वेडीला, माझ्या गुलछडीला


हिच्यासाठी आलो मी सासुरवाडीला


तुला न्यावयाला ग घेऊन गाडी


आलो सर्व सोडून मी शेतवाडी


तू असताना जोडीला


या बुरख्याच्या गाडीला


नवा रंग येईल गुलाबी साडीला


सांगा या वेडीला !


अहो सांगा या वेड्याला, माझ्या घरधन्याला


कशी जाऊ सांगा मी सासुरवाडीला


ही गाडी कुणाची, शेतवाडी कुणाची


बढाई नका ठोकू मोठेपणाची


सांगा या खोपडीला, नाही काणा झोपडीला


कशी जाऊ सांगा मी सासुरवाडीला


सांगा या वेड्याला !


बरे नाही तुझे माहेरी रहाणे


तू गावात बदनाम होशील याने


तुझ्या वाडवडिलां अन्‌ धर्मरुढिला


हे घातक होईल पुढच्या पिढीला


सांगा या वेडीला !


आहे थोरवी थोर माझ्या पिढीची


भली आज गावात इज्जत पित्याची


आहे मान त्याला अन्‌ त्याच्या पगडीला


अरे हसतील सारे तुझ्या रे परवडीला


सांगा या वेड्याला !


नको भांडू, भांडण विकोपास जाईल


तुझा-माझा तंटा मी पंचात नेईल


बसेन चावडीला, त्या पंचांच्या जोडीला


तुला मात्र नेईन मी याच घडीला


सांगा या वेडीला !


 


       🙏 अशा या लोकशाहीर वामनदादा कर्डक यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन 🙏


 


      डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे