पुणे जिल्हा न्यायालयातील वकील संघटना तर्फ़े प्रशांत भूषण यांच्या वरील कारवाईचा जाहीर निषेध व्यक्त

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


दिनांक: २४/०८/२०२०



पुणे: सर्वोच्च न्यायालयातील प्रख्यात व ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्या समर्थनार्थ आणि सर्वोच्च न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात काळ्या फिती बांधून शांततापूर्ण निषेध सभेचे आयोजन आज शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या आवाराबाहेर करण्यात आले होते. यामध्ये पुणे जिल्हा न्यायालयातील विविध वकील संघटना सामील झाल्या होत्या. यामध्ये अ‍ॅड. मोहन वाडेकर, अ‍ॅड. शाहीद अख्तर, अ‍ॅड. नाथा शिंगाडे, अ‍ॅड.मोनाली चं. अ., अ‍ॅड.गायत्री कांबळे, अ‍ॅड. प्रभाकर सोनवणे, अ‍ॅड. वाजीद खान, अ‍ॅड. आरिफ़ खान, अ‍ॅड. सुषमा नामदास, अ‍ॅड. अतुल गुंड-पाटील, अ‍ॅड. सैफान शेख आणि इतर वकील सामील झाले होते.


अ‍ॅड. प्रशांत भूषण (सर्वोच्च न्यायालयातील प्रख्यात व ज्येष्ठ वकील) यांना न्यायालयाचा अवमान केल्याबाबत दोषी ठरवण्यात आले. याचे कारण काय तर त्यांनी केलेले दोन ट्वीटस! ज्येष्ठ विधिज्ञांनी या निर्णयाबद्दल असहमती दर्शवत म्हटले आहे की "भूषण यांची विधाने अयोग्य, तर्कविसंगत असू शकतात. परंतु यातून न्यायालयाची अवमानना होत नाही."


सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत तत्परतेने निर्णय देत त्यांना दोषी ठरवले. न्यायव्यवस्थेवर टीका करणे म्हणजे तिचा अपमान करणे आहे का? टीका करणे म्हणजे अपमान करणे नाही. याचा अर्थ असा होतो की आपण टीकाच करू नये. जे बोलायचे ते चांगले बोलावे नाहीतर गप्प बसावे. पण संविधानाच्या कलम 19(1)(A) नुसार देशातील प्रत्येक नागरिकास भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे. वरील कारवाई एक प्रकारे ही या हक्काची पायमल्ली होत आहे, म्हणूनच आज पुणे जिल्हा न्यायालयातील अनेक वकीलांनी एकत्र येत काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला. संविधानाने दिलेले हक्क आणि अधिकार अबाधित राहावे म्हणून आम्ही बोलतोय, विरोध दर्शवतोय. आपले हक्क आणि अधिकार अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. आम्ही ती घेत आहोत असे प्रतिपादन सामील झालेल्या वकीलांनी व्यक्त केले.


Popular posts
राम उत्तम गालफाडे मा. पोलीस अधिकारी यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी
Image
जनशक्ती विकास संघाच्या पश्चिम महाराष्ट्र कोअर कमिटी अध्यक्षपदी छाया भोसले यांची नियुक्ती
Image
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट पुणे यांच्या वतीने २०० PPE किट आणि ४०० लिटर सॅनिटाइजर ससून हॉस्पिटलला सुपूर्त 
Image
४४.६% भारतीय विद्यार्थ्यांची ‘स्कूल फ्रॉम होम’ पर्यायास पसंती: ब्रेनली
Image
माजी विरोधी पक्षनेते, नगरसेवक कै. श्री दत्ता (काका) साने वय वर्षे ४७ यांचे दुःखद निधन झाले
Image