पुणे प्रवाह न्युज पोर्टल
कोरोना संकटात गरजुंना 'सूर्यदत्ता'चा मदतीचा हात
-----------------------------------------------------------
-----------------------------------------------------------
'सूर्यदत्ता'मुळे कोरोना संकटकाळात गरजुंना दिलासा
मार्च उजाडला आणि कोरोनाचं संकट देशासह महाराष्ट्रावर गडद होऊ लागलं. संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकारनं देशात लॉकडाऊन केलं आणि असंख्य आव्हानं उभी ठाकली. अर्थव्यवहार ठप्प झाले. रोजगार बंद झाले. अनेकांची रोजी-रोटी गेली. काही जणांवर उपासमारीची वेळ आली. सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले. अशावेळी समाजातील असंख्य हात उपेक्षितांच्या, गरजूंच्या पोटात दोन घास घालण्यासाठी पुढं आले. अनेक संस्थांनी कोरोनाबाबत जनजागृती करून, लोकांच्या मनातील भीती घालवण्याचा प्रयत्न केला. त्यातील एक नाव म्हणजे शिक्षण क्षेत्रातील नामांकित संस्था असलेल्या पुण्यातील सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचं.
'सूर्यदत्ता' परिवार सहभागी
सूर्यदत्ता संस्थेने कोरोनाच्या या संकटकाळात शहराच्या विविध भागातील शोषित, वंचित आणि गरजू लोकांना मदत करत एक नवा आदर्श घालून दिला आहे. लाखो लोकांना या मदतीचा लाभ झाला आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया आणि उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या पुढाकारातून संपूर्ण 'सूर्यदत्ता' परिवार या सेवाकार्यात सहभागी झाला. संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी या सर्वानीच आपापल्या परीने या कोरोना विरुद्धच्या लढाईत योगदान दिले आहे.
गरजूंना सर्वतोपरी मदत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, त्याचा फटका मजूरवर्ग, मध्यमवर्गीय लोकांना सर्वाधिक बसला. हातावर पोट असणाऱ्यांची संख्या मोठी होती आणि त्यांची अवस्थाही भयावह होती. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटनं एप्रिल महिन्यापासून हे कार्य 'मदत नव्हे, सेवाकार्य' या भावनेतून सूर केले. आजही ते कार्य सुरु आहे. धनकवडी, बावधन, कोथरूड, शिवाजीनगर, सिंहगड रस्ता, हडपसर, दांडेकर पूल आदी भागातील गरजूना अन्नधान्याचा पुरवठा, भोजनव्यवस्था करणाऱ्या संस्थांना साहाय्य, पोलिसांना पाणी, फळे, मास्क, सॅनिटायझर पुरविण्यात आले. संस्थेच्या फॅशन डिझाईन इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी मास्क तयार करून वाटले. वैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार यांना पीपीई किटचे वाटप करण्यात आले.
दर्जेदार शिक्षणासह सामाजिक बांधिलकी
सूर्यदत्ता ग्रुपने दर्जेदार शिक्षणासह सामाजिक बांधिलकीची जाणीव नेहमीच जपलेली आहे. समाजातील गरजूना भरीव मदत करण्यासह कोरोनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे मोठे कार्य 'सूर्यदत्ता'ने केले. कोरोनापासून दूर राहण्यासाठी घ्यावयाची काळजी, कोरोना झाल्यास घाबरून न जाता धैर्याने सामोरे जाण्याचा मार्ग, यासह शिक्षण क्षेत्रातील बदलत असलेल्या गोष्टी, शिक्षणप्रणाली, नवतंत्रज्ञान आदींविषयी तज्ज्ञ व्यक्तींची मार्गदर्शन सत्रे, वेबिनार्स नियमितपणे चालू आहेत. कर्मचाऱ्यांनी आपल्या वेतनातील काही रक्कम संस्थेच्या कोरोना फंडात जमा केली आहे. ही रक्कम पंतप्रधान आणि मुख्यमंत्री रिलिफ फंडाला लवकरच देण्यात येणार आहे. या सामाजिक कार्यासह शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी सूर्यदत्ताच्या वतीने ऑनलाईन अभ्यासक्रम, आंतरशाखीय ज्ञान, आत्मनिर्भर भारत आदी विषयांवर विपुल मार्गदर्शन झाले.
'कॅम्पस'चे नियमित निर्जंतुकीकरण
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'सूर्यदत्ता'मध्ये आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. परिसरात विविध ठिकाणी सॅनिटायझर्स स्टॅन्ड बसवले आहेत. सर्वाना मास्क अनिवार्य केला आहे. प्रवेशद्वारावर येणारे प्रत्येक वाहन निर्जंतुक करून आत सोडले जात आहे. परिसर नियमितपणे निर्जंतुक केला जात आहे. आवश्यक कर्मचारी वर्ग संस्थेत बोलावला जात असून, उर्वरित लोकांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ठिकठिकाणी कोरोनापासून बचावासाठी घ्यावयाची काळजी याचे फलक लावण्यात आले आहेत.
सुरक्षेसह प्रवेशप्रक्रिया सुरु
सर्वच प्रकारच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरु केले आहेत. ऑनलाईन प्रक्रियेतून हे प्रवेश होत आहेत. माहितीसाठी येणाऱ्या विद्यार्थी-पालकांची तपासणी करून, तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करून सोशल डिस्टनसिंग पाळून त्यांना प्रवेशाची माहिती दिली जात आहे. विद्यार्थी-पालकांनी प्रवेशासाठी अथवा माहितीसाठी कॉलेजात येण्यापेक्षा संस्थेच्या
कोरोना योद्धयांप्रती कृतज्ञता
कोरोनाच्या लढाईत अहोरात्र लढत असलेल्या डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस, पत्रकार आदी कोरोना योद्ध्यांच्याप्रती सूर्यदत्ताने नेहमी कृतज्ञता व्यक्त केली आहे. प्रा. डॉ. संजय चोरडिया आणि सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य पार पडत आहे. चोरडिया दाम्पत्याच्या पुढाकारातून झालेल्या या सामाजिक योगदानाबद्दल अनेक संस्थांनी सूर्यदत्ता ग्रुपला व डॉ. चोरडिया यांना 'कोरोना वॉरियर्स'चे प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे. यामध्ये 'डिक्की', सीओईपी, दिव्यांग क्रिकेट मंडळ, वर्ल्ड रेकॉर्ड बिनाले फाउंडेशन, भारतीय महाक्रांती सेना, सर्वश्रेष्ठ ब्राह्मण महासमिती मध्यप्रदेश, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अँड फिजिकल हेल्थ सायन्स आदी संस्थांचा समावेश आहे.
माणुसकी जपणे गरजेचे
कोरोनाच्या संकटकाळात समाजातील प्रत्येकाला झळ बसली. अनेकांवर उपासमारीची वेळ आली. सामाजिक जाणिवेतून माणुसकीचा पूल उभारत समाजातील वंचित, शोषित घटकांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून गेल्या चार महिन्यांपासून केला जात आहे. शिवाय, कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रातील नवे बदल, सामाजिक जनजागृती यावर तज्ज्ञांची असंख्य वेबिनार्स घेण्यात आली आहेत.
- प्रा. डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट