स्वातंत्र्य दिनानिमित पुणे मीडिया वॉच व १५ ऑगस्ट चौक आयोजित " करोना योध्दा पुरस्कार " वितरण सोहळा संपन्न

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


स्वातंत्र्य दिनानिमित पुणे मीडिया वॉच व १५ ऑगस्ट चौक आयोजित


" करोना योध्दा पुरस्कार " वितरण सोहळा संपन्न


 


स्वातंत्र्य दिनानिमित पुणे मीडिया वॉच व १५ ऑगस्ट चौक आयोजित " करोना योध्दा पुरस्कार " वितरण सोहळा पार पडला . पुणे कॅम्पमधील महात्मा गांधी रोडवरील १५ ऑगस्ट चौकात कर्नल सुरेश पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले . या कार्यक्रमाचे आयोजन पुणे कैन्टोन्मेट बोर्डचे उपाध्यक्ष व नगरसेवक अतुल गायकवाड , पुणे मीडिया वॉचचे संस्थापक महेश जांभुळकर व १५ ऑगस्ट चौकाचे अध्यक्ष निलेश कणसे यांनी केले होते .


यावेळी मनजितसिंग विरदी फाऊंडेशनचे अध्यक्ष मनजितसिंग विरदी , पुणे कैटोन्मेट बोर्ड , उम्मीद सामजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष जावेद खान , स्व. प्रेमा परशुराम भगत सामजिक सेवा संस्था अध्यक्ष विनय भगत , दलित पँथरचे केंद्रीय कार्याध्यक्ष यशवंत नडगम , लष्कर पोलिस ठाणे वरिष्ठ पोलिस निरिक्षक चंद्रकांत भोसले , सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाचे निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड , ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाथा डॉ. मुरलीधर तांबे , अल्फा ओमेगा सामजिक सेवा संस्था अध्यक्ष डैनियल लांडगे , गुरुद्वारा गुरुनानक दरबारचे अध्यक्ष चरणजितसिंग सहानी , गुरुसिंग सभा गुरुद्वाराचे अध्यक्ष भोलासिंग अरोरा, हिंद तरूण मंडळचे अध्यक्ष सनी कुराडे, श्री सूर्यमुखी दत्त मंदीरचे अध्यक्ष अशोक सुसगोहेर, स्वामी विवेकानंद संस्था अध्यक्ष दिनेशप्रसाद होले , विवेक यादव मित्र परिवार प्रमुख सुधीर यादव, अखिल भारतीय सर्व धर्म समाज पार्टी अध्यक्ष रमेश साळवे, केअर टेकर सोसायटीचे अध्यक्ष कुमार शिंदे , अक्षय कोठावळे व रविंद्र गायकवाड , होप मेडिकल फौऊडेशनचे अध्यक्ष डॉ. अमोल देवळेकर, आझम कॅम्पसचे अध्यक्ष - पी. ए. इनामदार , जनसेवा सामजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष रविंद्र खैरे, प्रेरणा चॅरिटेबल ट्रस्ट प्रमुख बलबीरसिंग छाबरा आदींचा " करोना योध्दा पुरस्कार " सन्मानचिन्ह , शाल व पुष्पगुछ देऊन सन्मानित करण्यात आले .