*पोलीस उपआयुक्त कार्यालयाच्या वाहतुक शाखेकडून* *बेवारस, बिनधनी दुचाकी*, *तीनचाकी व चारचाकी वाहनांचा लिलाव*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


पोलीस उपआयुक्त कार्यालयाच्या वाहतुक शाखेकडून


बेवारस, बिनधनी दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांचा लिलाव


 


पुणे दि10 : - पुणे शहरातील वाहतुक विभागात नोव्हेंबर 2017 पासून बेवारस, बिनधनी दुचाकी, तीनचाकी, चारचाकी अशी 115 वाहने पोलीस उपआयुक्त कार्यालय, वाहतुक शाखा, एअरपोर्ट रोड, पुणे येथे जमा आहेत. सदरची वाहने ओळखून घेऊन जाण्याबाबत वृत्तपत्रात प्रसिध्दी करुन तसेच सदर वाहनांचे मालकांचा शोध घेऊनही मालक मिळून आलेले नाही. या वाहनांची स्थितीही खुप दिवस पडून असल्याने गंजलेली व खराब झालेली आहेत. 


 या वाहनांची कायदेशीर बाबींची पुर्तता करुन लिलावाची मंजुरी मिळालेली असून सदर वाहनांचा लिलाव 14 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11 वा. पोलीस उपआयुक्त कार्यालय, वाहतुक शाखा, एअरपोर्ट रोड, पुणे येथील आवारात करण्यात येणार असल्याचे येरवडा वाहतुक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी कळविले आहे.  


                                                                               0 0 0 0 0