पुणे प्रवाह न्युज पोर्टल
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता हिंदवी स्वराज्य तरुण मंडळाचा ५८ वा
श्री गणेशोत्सव हातमोजे व सॅनिटायजरचा वापर करून साध्या पध्दतीने साजरा
पुणे कॅन्टोन्मेंटमधील पुलगेट भागातील हिंदवी स्वराज्य तरुण मंडळ आपला ५८ वा श्री गणेशोत्सव साजरा करत आहे .
सध्या कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता मंडळाने आरती व इतर सर्व कार्यक्रमाच्या वेळी हातमोजे व सॅनिटायजर वापरण्याचा निर्णय घेतला आहे . तसेच , कोरोनाचा काळात सेवाभावी कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार " कोरोना योद्धा " म्हणून करण्यात येणार आहे . मंडळाच्या वतीने अकरा गरजू कुटुंबाना अन्नधान्याची मदत श्री गणेशोत्सवात करण्यात येणार आहे .
सार्वजनिक श्री गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीशताब्दी निमित्त मंडळाच्यावतीने विनम्र अभिवादनाचा फलक लावला आहे .
सामाजिक आरोग्याचे महत्व लक्षात घेऊन मंडळ अंत्यंत साध्या पध्दतीने यंदाचा श्री गणेशोत्सव साजरा करीत आहे .
मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक व सल्लागार म्हणून प्रविण दवे , गोविंद भुतडा , बबलू दोशी , पदमा देवासी , राठोड , सोमण पिलाई म्हणून कार्यरत आहेत .
मंडळाचे प्रमुख पदाधिकारी निखिल पवार , सोनू पवार , आकाश चव्हाण , योगेश होळकर , मिलिंद भोसले , सूरज कांबळे व शॉन हॉल आदी कार्यरत आहेत .