लुफ्थांसाच्या भारतातील इनबाउंड पॅसेंजर फ्लाइट्स पुन्हा सुरू

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


  


 


 


मुंबई, १६ ऑगस्ट २०२०: भारत आणि जर्मनी यांच्या दरम्यान झालेल्या द्विपक्षीय करारानंतर भारतात लुफ्थांसाच्या इनबाउंड पॅसेंजर फ्लाइट्स पुन्हा सुरू होतील. प्रवासी आता लुफ्थांसाच्या विमानाने भारतात प्रवास करू शकतात. फ्रँकफर्ट ते दिल्ली, म्युनिक ते दिल्ली, फ्रँकफर्ट ते बंगळुरू, फ्रँकफर्ट ते मुंबई अशा फ्लाईट्स असणार आहेत 


 


 


 


ऑगस्ट अखेरपर्यंत दिल्ली, मुंबई, बंगळुरूसाठी सुमारे ४० इनबाउंड उड्डाणे उपलब्ध आहेत. लुफ्थांसा ऑगस्टनंतर भारताकडे येणाऱ्या नियोजित उड्डाणांसाठी योग्य वेळेत पुन्हा अर्ज करेल. यासाठी भारतीय अधिकाऱ्यांचा सविस्तर सल्ला घेतला जाईल.  


 


 


 


लुफ्थांसाची अनेक महिन्यांपासून भारतातील दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू येथून फ्रँकफर्ट आणि म्युनिक हबला जाण्यासाठी आउटबाउंड पॅसेंजर फ्लाइट्स सुरू आहेत. भारत आणि लुफ्थांसा येथून उड्डाणांसाठी लागू असलेली भारतीय नियमावली लुफ्थांसाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


 


 


 


लुफ्थांसा समूहाच्या दक्षिण आशिया विक्रीसाठीचे वरिष्ठ संचालक जॉर्ज एटिल म्हणाले “ जगात हळूहळू कामकाज सुरू होत असल्याने लोकांना भारतात परत येण्यास आणि व्यवसायिक प्रवासास सक्षम बनवण्यासाठी मदत करू शकतोय, याचा आम्हाला खूप आनंद आहे. सुरक्षा आणि स्वच्छतेच्या सर्वोच्च मापदंडाचे समर्थन करताना आमच्या भारतीय ग्राहकांसाठी या अनिश्चित काळात भारतात आणि तेथून येथे प्रवास सक्षम करण्याची लुफ्थांसाची बांधिलकी अधोरेखित करते.”  


 


 


 


जुलैपासून लुफ्थांसा भारतीय ग्राहकांना शॉर्ट टर्म नोटीसवर कोरोना व्हायरसची तपासणी करण्यासाठी फ्रँकफर्ट आणि म्युनिक विमानतळांवर सुविधा देत आहे. या पीसीआर कोरोना व्हायरस चाचण्यांसाठी फक्त घशातील स्वॅब घेणे आवश्यक आहे.“ फ्रँकफर्ट आणि म्युनिक येथील आमच्या केंद्रांवरील कोरोना व्हायरस चाचणी केंद्रे ग्राहकांना चाचणी निगेटीव्ह आल्यास जर्मनीत आल्यावर क्वारंटाइन होणे टाळण्यास मदत करतात,” असे एटिल म्हणाले.. चाचण्यांचे निकाल चार ते पाच तासांत उपलब्ध होऊन ते ग्राहकांच्या फ्लाइट तिकिटाशी जोडलेले असतात, यामुळे पीसीआरकोरोना व्हायरस प्रमाणित चाचणी स्वीकारणाऱ्या जगातल्या इतर देशांमध्ये सुरक्षित प्रवास करणे सुलभ होते. परिणामी क्वारंटाइनची प्रक्रिया टाळता येते.”


 


 


 


प्रवाशांची सुरक्षा नेहमीच लुफ्थांसासाठी प्राधान्यक्रमावर असणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जात आहे . लुफ्थांसा ग्रुप एअरलाइन्सद्वारे कार्यान्वित एअरक्राफ्टमध्ये फिल्टर असून ते धूळ, बॅक्टेरिया आणि व्हायरससारख्या दुषित पदार्थांपासून केबिनची स्वच्छता करतात.


 


 


 


अतिथी आणि चालक दल यांच्यामधील संवाद तसेच बोर्डवरील संक्रमणाचा धोका कमी करण्यासाठी, उड्डाणाचा कालावधी लक्षात घेऊन बोर्डवरील सेवा नव्याने आखण्यात आली आहे. या तत्त्वानुसार, फ्लाइट दरम्यान, व्हायरसचा संसर्ग होण्याचा धोका अत्यंत कमी होतो.


 


 


 


Popular posts
शिवपुत्र राजाराम महाराज 🚩"  शिवाजी महाराजांच्या  तृतीय पत्नी राणी सोयराबाई यांच्या पोटी 24 फेब्रुवारी 16 70 रोजी राजाराम महाराजांचा जन्म झाला .
Image
बीगॉसची मनीटॅपसह भागीदारी
Image
ज्ञानदाइन्स्टिट्यूट ऑफ फ्लो पायपिंग टेक्नॉलॉजी द्वारे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध
२७ फेंबुवारी मराठी भाषा दिन* जाणतो मराठी .......मानतो मराठी ; जागतिक मराठी दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image