आचार्य अत्रे यांच्या जयंतीनिमित्त* *उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


उपमुख्यमंत्री कार्यालय, 


मंत्रालय, मुंबई.


दि. 13 ऑगस्ट 2020.


 


 


*


         मुंबई, दि. 12 :- संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील झंझावाती नेतृत्वं, महान साहित्यिक, प्रल्हाद केशव तथा आचार्य अत्रे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केलं असून महाराष्ट्राची निर्मिती व जडणघडणीतील त्यांचं योगदान राज्यातील जनता कधीही विसरणार नाही, अशा शब्दात त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.


              उपमुख्यमंत्री अजित पवार हे आचार्य अत्रे यांना अभिवादन करताना म्हणाले की, आचार्य अत्रे म्हणजे अद्वितिय प्रतिभेचं व्यक्तिमत्वं होतं. ते जनमानसावर प्रभाव असलेले नेते होते. ते थोर विचारवंत होते. महान साहित्यिक होते. फर्डे वक्ते होते. निर्भीड संपादक होते. वैचारिक वादविवादातून समाजाला दिशा देण्याचं काम त्यांनी केलं. तत्कालिन राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी 'रायटर अँड फायटर ऑफ महाराष्ट्र' असं त्यांचं केलेलं वर्णन म्हणूनचं सार्थ ठरतं, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आचार्य अत्रे यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या साहित्यकृती हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा आहे. त्यांच्या राजकीय, सामाजिक कार्याबद्दल तसंच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील योगदानाबद्दल महाराष्ट्र सदैव त्यांचा ऋणी राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.


००००००


Popular posts
राम उत्तम गालफाडे मा. पोलीस अधिकारी यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी
Image
जनशक्ती विकास संघाच्या पश्चिम महाराष्ट्र कोअर कमिटी अध्यक्षपदी छाया भोसले यांची नियुक्ती
Image
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट पुणे यांच्या वतीने २०० PPE किट आणि ४०० लिटर सॅनिटाइजर ससून हॉस्पिटलला सुपूर्त 
Image
४४.६% भारतीय विद्यार्थ्यांची ‘स्कूल फ्रॉम होम’ पर्यायास पसंती: ब्रेनली
Image
माजी विरोधी पक्षनेते, नगरसेवक कै. श्री दत्ता (काका) साने वय वर्षे ४७ यांचे दुःखद निधन झाले
Image